सोशल मीडियावरून हिंदू देवी-देवतांचा अपमान; मीरारोड मध्ये अब्दुलविरोधात गुन्हा दाखल

    13-May-2024
Total Views | 73

Social Media

मुंबई (प्रतिनिधी) :
मीरा भाईंदर (Mira Bhayandar News) विभागातील नवघर पोलीस ठाण्यात एका ‘अज्ञात’ व्यक्तीविरुद्ध सोशल मीडियाचा वापर करून हिंदू देवी-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुरुवार, दि. ९ मे रोजी झालेले हे प्रकरण नुकतेच समोर आले आहे. अब्दुल रशीद अब्दुल लतीफ असे आरोपीचे नाव असून भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत कलम २९५ अ, १५३ अ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० नुसार कलम ६६ क आणि ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू देवी-देवतांची छायाचित्रे वापरली आणि समाजाच्या हिंदू धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी सदर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
अभिजीतला

अभिजीतला 'अमोल' साथ; 'सुंदर मी होणार’ नाटकात अभिजीत चव्हाण आणि अमोल बावडेकर दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत!

चौकट मोडून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करून पाहायला कलाकार कायमच उत्सुक असतात. आपल्या विनोदी शैलीने मालिका आणि चित्रपटात मजेशीर रंग भरणारे अभिनेते अभिजीत चव्हाण आता प्रथमच वेगळ्या सशक्त भूमिकेत दिसणार आहेत. ‘सुंदर मी होणार’ या नाटकातल्या महाराज (संस्थानिक) या महत्त्वपूर्ण भूमिकेतून अभिजीत चव्हाण अनेक वर्षानंतर मराठी रंगभूमीवर काम करणार आहेत. स्वतःची विनोदी इमेज ब्रेक करत एक अत्यंत गंभीर आणि भावनिक पात्र साकारण्याचे शिवधनुष्य पेलणाऱ्या अभिजीत यांना साथ करत अभिनेते अमोल बावडेकर यांचा ही अनोखा अंदाज या नाटकात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121