एम सी स्टॅनचा रॅपला रामराम?

    09-Apr-2024
Total Views | 53
एम सी स्टॅनने रॅप सोडलं? पोस्टवरुन चाहते पडले संभ्रमात
 

mc stan  
 
मुंबई : बिग बॉस १६ चा विजेता एम सी स्टॅन (MC Stan) त्याच्या रॅप मुळे प्रसिद्ध आहे. त्याचे देशभरात अनेक चाहते आहेत ते याच रॅपमुळे. पण एम सी स्टॅनच्या (MC Stan) चाहत्यांना आता एक धक्का बसला आहे. कारण त्याने पोस्ट करत रॅप सोडणार असी एक पोस्ट त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन केली. पण काही वेळाने त्याने ती स्टोरी डिलीट देखील केली. त्यामुळे नेमकी काय झालं याचं उत्तर सध्या त्याचे चाहते शोधत आहेत.
 
एम सी स्टॅनचे रॅप हे एक कौशल्य आहे. मुळचा पुण्याचा असलेल्या स्टॅनची अनेक रॅप गाणी सुप्रसिद्ध आहेत. तो लाईव्ह कॉन्सर्ट्सही करतो. त्यामुळे जर का खरचं स्टॅनने रॅप करणं सोडलं असेल तर त्याचं कारण काय? आणि तसं नसेल तर असा स्टंट करण्याचेही कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
 

mc stan
mc stan  
 
दरम्यान, काही दिवसांपुर्वी एम सी स्टॅनचे युट्यूब चॅनल हॅक झाले होते. त्याने मुलाखतीत सांगितलं होतं की, "मी झोपलो होतो, मध्यरात्री जेव्हा मला जाग आली तेव्हा पाहिलं की माझ्या युट्यूबवर लाईव्ह सेशन सुरु आहे." आता स्टॅनच्या रॅप बद्दलच्या पोस्टची गोष्ट काय आहे याचे उत्तर ऐकण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121