नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये एका तरुणावर इस्लाम धर्म स्वीकारण्यास दबाव टाकण्यात आला. तसेच त्या तरुणाला कलमा ही जबरदस्तीने शिकण्यास भाग पाडले. ही घटना दि. ५ एप्रिल २०२४ रोजी घडली. हरियाणात राहणारा संदीप नावाचा पीडित तरुण काश्मिरी कुटुंबात काम करत होता. दर्गा हजरतबल येथे जुमात-उल-विदा नावाच्या प्रार्थनेदरम्यान त्याला शहादा (अल्लाहशिवाय दुसरा कोणीही देव नाही याचा पुनरुच्चार करण्यास सांगणे) आणि कलमा म्हणण्यास भाग पाडले गेले, असा आरोप त्याने केला आहे.
दरम्यान या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये हजरतबल दर्ग्याचे इमाम आणि खतीब कमाल फारुकी संदीपला विचारताना दिसत आहेत की, तो स्वेच्छेने इस्लाम स्वीकारत आहे की त्याच्यावर जबरदस्ती केली जात आहे? यावर संदिप म्हणतो की, तो स्वतःच्या इच्छेने इस्लामचा स्वीकार करत आहे. यानंतर खतीब कमाल फारुकी यांनी कलमा वाचला आणि संदीपने त्यांच्यासोबत पुन्नरउच्चार केला. यावेळी दर्ग्यात अनेक मुस्लिमांची गर्दी झाली होती.
यानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आणि लक्षात आले की संदीप कुमारचे नोहट्टा येथील रहिवासी अनयत मुंतझीरने मानसिक छळ केला होता. नौहट्टा मुंताजीर हा तोच व्यक्ती आहे ज्यांच्या घरात संदीप काम करत होता. तो संदीपसोबत दर्ग्यात गेला होता. याप्रकरणी नागीन पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आयपीसी कलम १८८ (सरकारी सूचनांचे उल्लंघन), २९८ (धार्मिक उन्माद भडकवण्यासाठी काहीतरी बोलणे), १५३ (दंगली भडकवण्याचा कट) आणि १५३A (धर्म किंवा वंशाच्या आधारावर द्वेष भडकावणे) लावण्यात आले आहेत.
पोलिसांनी एफआयआरमध्ये लिहिले आहे की, या घटनेबाबत जम्मू-काश्मीरच्या बाहेरूनही प्रतिक्रिया आल्या आहेत. या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आली आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिस अधीक्षकांना (एसपी) अहवाल पाठवण्यास सांगितले आहे. यामध्ये अनायत मुंतझीरलाही आरोपी आहे. या घटनेमुळे सांप्रदायिक शांतता आणि सहिष्णुतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या व्हिडिओमुळे लोकांमध्ये तणावाचे वातावरण आहे.