भीमजयंतीच्या मिरवणूकीवर कट्टरपंथींचा हल्ला! विवेक विचार मंचातर्फे एसआयटी चौकशीची मागणी

    24-Apr-2024
Total Views | 45
bhimjayanti
 
धुळे : जिल्यातील दोंडाईचा येथे भीमजयंती मिरवणुकीवर कट्टरपंथी जमावाकडुन हल्ला करण्यात आला. भीमजयंती मिरवणुक दोंडाईचा येथिल जामा मशीद येथुन जात असताना कट्टरपंथी जमावाने मिरवणुकीवर भीषण हल्ला केला. या हल्ल्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी विवेक विचार मंचच्या वतीने करण्यात आली आहे. धुळे येथे पिडीत नागरिक, मुख्य फिर्यादी गोविंदा नगराळे व विवेक विचार मंचाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले तसेच पत्रकार परिषद घेण्यात आली.
 
१४ एप्रिलला संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती संपूर्ण भारतात साजरी केली जाते. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे भीम जयंतीची मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि शिस्तीत सुरु होती. सदर मिरवणूक जामा मशिदी जवळून डॉ.आंबेडकर पुतळ्याकडे जात असताना मिरवणूक अडवण्यात आली व रस्त्याने जावू नये म्हणून दमदाटी करण्यात आली. लगेचच समाज कंटकांनी मिरवणुकीवर दगडफेक केली, मारहाण सुरु केली, रासायनिक स्प्रेचा वापर करण्यात आला. या भीषण घटनेत महिला पुरुषांसह अनेक जण जखमी झाले.
  
सदर हल्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व गौतम बुध्दांच्या मुर्तीची विटंबना देखील करण्याचा प्रयत्न झाला. आरोपींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे व गौतम बुध्दांचे पोस्टर देखील फाडले व त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असा आरोप विवेक विचार मंचने केला आहे.
 
यावेळी दोंडाईचा येथील पिडीत आंबेडकरी महिला, पुरुष, मुख्य फिर्यादी गोविंदा नगराळे, रेखाताई दिलीप नगराळे, महेंद्र शिरसाठ, वर्षा गुलाले, विवेक विचार मंचचे जयेश चौधरी, ऍड निखिल भावसार, महेंद्र विसपुते, ऍड.वडनेरे उपस्थित होते.
विवेक विचार मंचने या पत्रकारपरीषदेत या संवेदनशील घटनेचा सखोल तपास व्हावा व हा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत विशेष तपास पथक (SIT) द्वारे किवा केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे केला जावा. २. सदर प्रकरणात पोलिसांनी योग्य कलमे लावलेली नाही त्याची दाखल घ्यावी. या प्रकरणात आरोपींची पार्श्वभूमी तपासून मोक्का ( महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, १९९९ ) कायद्या अंतर्गत कारवाई व्हावी. आणि सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी या मागण्या करण्यात आल्या आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121