केजरीवाल ईडी अधिकाऱ्यांची हेरगिरी करत होते?, रिपोर्टमध्ये कुटुंबापासून ते संपत्तीपर्यंतचा सर्व तपशील!
22-Mar-2024
Total Views | 182
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक केल्यानंतर अनेक नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत. आता केजरीवाल यांच्या घरातून ईडीच्या अधिकाऱ्यांबद्दल १५० पानांचा अहवाल प्राप्त झाला आहे. यासंदर्भात केजरीवालांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याची तयारी सुरू झाली असून आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, केजरीवाल ईडीच्या अधिकाऱ्यांची हेरगिरी करत होते का?, अहवालात ईडीने म्हटले की, कुटुंबापासून ते संपत्तीपर्यंतचा सर्व तपशील गोळा करण्यात आला. केजरीवाल यांच्याकडून अतिरिक्त संचालक कपिल राज आणि विशेष संचालक सत्यव्रत, घोटाळ्याची चौकशी करणारे अधिकारी यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत होते. तसेच, गुरुवारी रात्री अटकेच्या वेळी ईडीला अरविंद केजरीवाल यांच्या घरातूनच ही फाइल मिळाली, ज्यामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात.
एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कपिल राज आणि सत्यव्रत यांचे डोजियर त्यांच्याच घरातून बनवत होते. हे दोन अधिकारी काय करतात? कोणती प्रकरणे आहेत आणि दोघांकडे किती मालमत्ता आहे? या सगळ्याची संपूर्ण माहिती केजरीवाल यांनी तयार केली होती. ईडीने सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. आता ईडी यावेळी कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती मिळत आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दि. २१ मार्च रोजी अटक केली होती. त्यांना त्यांच्या राहत्या घरातूनच अटक करण्यात आली. केजरीवाल यांच्या अटकेपूर्वी ईडीने त्यांना ९ वेळा चौकशीसाठी बोलावले होते. अटकेनंतर उच्च न्यायालयात अटकेला स्थगिती देण्याची मागणीही केली होती, परंतु त्याला कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यानंतर ईडीने त्याला त्याच्या घरातून अटक करताना दीडशे पानांची ही फाईलही ईडीच्या हाती आली आहे.