रात्री-अपरात्री घरात घुसून पीडितेची छेड काढणाऱ्या नदीमला चोप!

समाजमाध्यमांवर "मॉब लिंचिंग"च्या गंड्या पिकवल्या!

    14-Mar-2024
Total Views | 87
muzaffarnagar case


नवी दिल्ली
: उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणाचे हात पाय दोरीने बांधलेले असून त्याच्या आजूबाजूला अनेक लोक दिसत आहेत. दरम्यान एका पीडित महिलेचा मदतीचा आक्रोश येत आहे. तसेच या व्हिडिओत मुस्लिम तरुणाला जमावाने मारहाण केल्याचे चित्र रंगवले जात आहे.इस्लामिक नावांसह ट्विटर अकाउंट्वर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. "४ मार्च रोजी यूपीच्या मुझफ्फरनगरमध्ये जमावाने नदीम नावाच्या मुस्लिम तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्याचे हात पाय दोरीने बांधले. 'आरोपींवर' कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी पीडित नदीमला पोलिस ठाण्यात तासंतास बसवून ठेवले, असा पीडित कुटुंबाचा आरोप आहे.



नदीम नावाच्या मुस्लिम तरुणाला जमावाने घेरले आणि दोरीने बांधून मारहाण केल्याचा दावा या व्हिडिओद्वारे केला जात आहे. हे प्रकरण डाव्या-उदारमतवादी टोळीच्या मॉब लिंचिंग आणि 'मॉब लिंचिंग' अजेंडाशी जोडले जात आहे. यामध्ये हिंदूंनीच या मुस्लिम तरुणाला बेदम मारहाण केल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय पोलिस कारवाई करत नसल्याचा आरोपही केला जात आहे. परंतु हे प्रकरण मुस्लिम तरुणांच्या भांडणाचे आहे. यासबंधी एफआयरची प्रतही एका वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली आहे.




पोलिसात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, व्हिडिओमध्ये दिसणारा तरुण नदीम पोलिस स्टेशन रतनपुरीच्या फुलत गावचा रहिवासी आहे. ३ मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजता तो त्याच गावातील अफजलच्या घरात घुसला. नदीम हा अफजलच्या घरी मुलगी शिबाचा विनयभंग करण्यासाठी आला होता. याची माहिती अफजलला समजताच त्याने नदीमला त्याच्या कुटुंबासह पकडले.यानंतर नदीमला मारहाण करण्यात आली. मात्र, नदीमला मारहाण करून ही तो आरेरावी करत भावाला घेऊन अफजलला मारण्यासाठी आला. नदीम नौशाद, दिलशाद, मुदस्सीर आणि सोनू या आपल्या भावांसह घरात घुसला आणि अफजलच्या कुटुंबावर लाठ्या आणि लोखंडी रॉडने हल्ला केला.

तसेच नदीमने अफजलच्या कुटुंबियांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर परिसरातील इतर लोक नदीम आणि त्याच्यासोबत असलेल्या गुंडांना रोखण्यासाठी आले असता ते पळून गेले. या हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील लोक जखमी झाल्याचे अफजलने म्हटले आहे.मुझफ्फरनगर पोलिसांनी या प्रकरणी म्हटले आहे की, “हे प्रकरण त्याच समुदायाशी संबंधित आहे ज्यामध्ये रतनपुरी पोलीस ठाण्यात दि.४ मार्च रोजी संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवून ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि तुरुंगात पाठवण्यात आले आहे. "रतनपुरी पोलिस ठाण्यात आगाऊ कायदेशीर कारवाई सुरू आहे."तरी या प्रकरणात मॉब लिंचिंगची पसरवलेली माहिती खोटी आहे. ज्यामध्ये नदीमने एका मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर त्याने मुलीच्या कुटुंबावर हल्ला केला. अशा स्थितीत जमावाने मारहाण केली.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121