मोहित सोमण
मुंबई: अर्थव्यवस्थेत अनेक स्थित्यंतरे होत असतात. यातील महत्वाचा गाभा लॉजिस्टिक क्षेत्र असल्याने या क्षेत्रातील वाढीमुळे विकसनशील देशात व्यवसाय विकासाची शक्यता अधिक असते. याच धर्तीवर रिअल्टी क्षेत्रातील पायाभूत सुविधा, सामग्री, दळणवळण या गोष्टी पोचवण्यासाठी लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान असते. या क्षेत्रातील संदर्भात नुकताच कुशमन व वेकफिल्ड वार्षिक लॉजिस्टिक अहवाल जाहीर झाला आहे. या अहवालानुसार लॉजिस्टिक व इंडस्ट्रियल लिजींगमध्ये मोठी वाढ झाली आहे. यात म्हटल्याप्रमाणे मुंबईत प्रकल्प पूर्ण करण्याचा वेग मात्र थंडावला आहे. एमएसएफ १.७ टक्क्याने प्रकल्पाचा वेग मंदावला आहे. आर्थिक वर्ष २४-२६ मध्ये मात्र पुरवठ्यात भरघोस वाढ झाली असल्याने प्रकल्पासाठी दर वेग २६ एसएसएफ इतका राहिला आहे.
सगळ्या बाजारात उपबाजारात हा पुरवठा कायम राहिला आहे. अहवालानुसार मटेरियलचा वापर ४.४ एमएसएफने कायम राहिला आहे. इयर ऑन इयर बेसिसवर मागणीत किंचीत वाढ झाली असून येणाऱ्या आर्थिक वर्षात मटेरियलचा मागणीत वाढ होईल असा अंदाज अहवालात व्यक्त केला आहे. रिअल्टी क्षेत्रातील पुरवठ्यात घट होऊनदेखील मागणीत झालेल्या थोड्यावाढीमुळे भाड्याच्या घरांच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
या वर्षी मुंबई शहर व उपनगरात वाढलेल्या मागणीमुळे व पर्यायाने वाढत्या लॉजिस्टिक्समुळे घर, कार्यालयांच्या कामकाजात वाढ होईल. आर्थिक वर्ष २३ मध्ये १.७ एमएसएफने मागणी घटत गेल्या काही वर्षांतील मागणीची संख्या घटत आहे. बांधकाम क्षेत्रातील बांधकामाचा वेगही तुलनेने मंदावला असल्याचे अहवालात स्पष्ट केले गेले आहे. आर्थिक वर्ष २३ मध्ये अपेक्षित असणारी बांधकाम पुढील आर्थिक वर्षात ढकलली जाऊन प्रलंबित होऊ शकतात. मात्र अहवालात नोंदवण्यात आलेल्या माहितीनुसार, बीकेसी, अंधेरी, कुर्ला रोड व मध्य उपनगरात मात्र हा लॉजिस्टिक्सल पुरवठा वाढू शकतो.
बीएफएसआय, व सेवा क्षेत्रातील वाढीमुळे कार्यालयांची मागणी वाढणार आहे. वाढत्या मागणीमुळे व वाढलेल्या पुरवठ्यात ५ एमएसएफ कमी झाला तरीदेखील पुढील दोन आर्थिक वर्षात पुरवण्याहून मागणीत वाढ होऊ शकते. एकूण मागणी पुरवठ्यात वाढ झाली तरी आर्थिक वर्ष २०२५ नंतर रिक्त पदातही वाढ होऊ शकते.
घरभाडे -
मुंबईतील घरातून उत्पन्न मिळणाऱ्या भाड्यात वाढ होणार आहे.
अहवालानुसार वाढत्या मागणीप्रमाणेच पुरवठ्यात देखील वाढ होऊ शकते. व घरभाडयात वाढ कायम राहील.
घरभाडी २०२५ पर्यंत ०.८ ते १.२ टक्के वाढणार
आर्थिक वर्ष २०२५ नंतर घरभाडयातील वाढ १.२ टक्क्याने कायम राहिल
यामुळे अहवालातील निष्कर्षाप्रत मुंबईतील रियल्टी व लॉजिस्टिक क्षेत्रात मागणीप्रमाणे पुरवठा देखील वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.