“केदार शिंदे यांना श्रीयुत गंगाधर टिपरे मालिका माझ्या पुस्तकात दिसली” - दिलीप प्रभावळकर
14-Feb-2024
Total Views | 44
रसिका शिंदे-पॉल
मुंबई : झी मराठी वाहिनीवर अनेक मालिका या प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या होत्या. त्यातील एक विनोदी मालिका म्हणजे 'श्रीयुत गंगाधर टिपरे'. २००१ ते २००५ या काळात झी मराठीवर प्रसारित झालेल्या या मालिकेची खास आठवण ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी 'महाएमटीबी'शी बोलताना सांगितला. यावेळी त्यांनी असे म्हटलं की, “माझ्या पुस्तकात केदार शिंदे यांना टिपरे मालिका दिसली म्हणून ती तुमच्यापर्यंत पोहोचली”.
दिलीप प्रभावळकर म्हणाले की, “ ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या गाजलेल्या मालिकेबद्दल प्रेक्षकांनी कधी बंद करणार हे विचारण्याऐवजी का बंद केली हे विचारण बरं, असा विचार करुन मी आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी विचारपुर्वक ही मालिका बंद केली. मुळात श्रीयुत गंगाधर टिपले ही मालिका मी लिहिलेल्या ‘अनुदिनी’ या पुस्तकावरुन करण्यात आली. माझ्या पुस्तकात केदार शिंदे यांना मालिका दिसली आणि मग विचार करुन मालिकेसाठीचे लिखाण गुरु ठाकूर यांनी केले. या मालिकेतील टिपरे कुटुंबाबद्दल बोलायचे झाल्यास ती पात्रं म्हणजे आबा, शेखर, शामला, शिऱ्या आणि शलाका ही पात्र मी माझ्या कल्पनेतून तयार केली होती. आणि ती मालिका प्रेक्षकांना फार आवडली याचा आनंद आहे,” अशा भावना प्रभावळकर यांनी व्यक्त केल्या.