साईनपोस्ट इंडिया लिमिटेड कंपनी बीएससी व एनएससीवर नोंदणीकृत
२०१३ मध्ये प्रेसमन ही शेअर बाजारात 'लिस्टिंग' झालेली पहिली जाहिरात कंपनी होती
प्रेसमन कंपनीचे साईनपोस्ट इंडिया या जाहिरात कंपनीत विलिनीकरण
मुंबई : साईनपोस्ट इंडिया लिमिटेड या डिजिटल आऊट ऑफ होम जाहिरात स्पेशालिस्ट जाहिरात कंपनीने आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएससी), नॅशनल टॉक एक्सचेंज (एनएससी) वर आपल्या कंपनी नोंदणीकृत केल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली आहे. सध्याच्या घडीला डीडीओएच जाहिरात करणारी साईनपोस्ट भारतातील पहिली शेअर बाजारात नोंदणीकृत (लिस्टेड) कंपनी ठरली आहे. ही कंपनी प्रामुख्याने प्रोग्रॅमटिक जाहिरातीसाठी प्रसिद्ध संस्था असून कन्व्हेशनल, ट्रान्झिट मिडिया (स्कायवॉक, बस पॅनल, एअरपोर्ट, मेट्रो स्टेशन, मोबाईल व्हॅन) अशा विविध वाहतूक माध्यमांवर डिजिटल जाहिराती करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
कंपनीचे मुख्य ग्राहक कनज्यूमर गुड्स पासून बीएफएसआय, लाईफस्टाईल, रियल इस्टेट एंटरटेनमेंट, टेलिकॉम अशा विविध क्षेत्रातील आहेत. आर्थिक वर्ष २२-२३ मध्ये साईनपोस्ट इंडियाने ३४२ कोटींचा महसूल प्राप्त केला असून ८४ टक्क्याने कंपनीची महसूल वाढ दिसली आहे. निव्वळ नफा ३५ कोटींच्या घरात गेला असून सीएजीआर ( कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट) ३० टक्क्याने वाढला आहे. डिजिटल असेटस मध्ये देखील ग्रोथ झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आली आहे. कंपनी डेट टू इक्विटी रेशो ०.६३ टक्के इतका आहे. यातूनच कंपनीची सधन आर्थिक परिस्थितीचे आकलन झाले आहे. साईनपोस्ट इंडियाला बँक क्रेडिटसाठी बीबीबी/ पॉसिटीव्ह व क्रिसिल कडून ए ३ रेटिंग मिळालेले आहे.
कंपनीच्या लिस्टिंग विषयी बोलताना साईनपोस्ट इंडिया कंपनी लिमिटेडचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद अष्टेकर म्हणाले, ' आज कंपनीचे बीएससी एनएससीचे लिस्टिंग हे कंपनीच्या नव्या उमेदीच्या काळाचे द्योतक आहे. आम्ही लोकाभिमुख ब्रँड विकसित करण्यासाठी कटिबद्ध असून ग्राहक व ब्रँड यांच्यातील दुवा म्हणून नवीन संशोधनासाठी उत्सुक आहोत.'
सध्या मुंबई मेट्रो लाईन २ एक व लाईन ७ आणि नवी बीएसटी बसेसचे कंत्राट कंपनीला मिळालेले आहे. कंपनीने लिस्टिंग बरोबरच आपले मागील ९ महिन्याचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. जाहीर केलेल्या माहितीनुसार कंपनीला ३१ डिसेंबर २३ पर्यंत तिमाहीत चांगला नफा मिळाला आहे. एकत्रितपणे कंपनीचे एकूण उत्पन्न ३१ डिसेंबर २३ पर्यंत १०६.६२ कोटी म्हणजेच ८६ टक्क्याने निव्वळ नफ्यात वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात हा नफा ५५ टक्क्याने वाढत २८९.५१ टक्के इतका वाढला होता.
लिस्टिंग केलेल्या इक्विटी शेअर्सची फेस व्हॅल्यू २ रूपये प्रति शेअर ठेवण्यात आली असून १४ फेब्रुवारी २०२४ पासून व्यवहारासाठी कंपनीचे शेअर्स उपलब्ध असतील.