मुंबई : मुंबईतील आझाद मैदानावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच देशभरातील दिग्गजांच्या मांदियाळीत महायुती सरकारचा शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला आहे. शपथविधी सोहळ्यानंतर राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही मंत्रालय परिसरात दाखल झाले . मंत्रालयातील लाडक्या बहिणींकडून लाडक्या भावांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.
मंत्रालयात त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मुख्यमंत्री सचिवालयातील महिला कर्मचाऱ्यांकडून महायुती सरकारच्या या तिन्ही प्रमुख नेत्यांचे औक्षण करण्यात आले. फुलांच्या वर्षावात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात प्रवेश केला आहे.
#WATCH | Mumbai: After taking oath, Maharashtra CM Devendra Fadnavis along with his Deputy CMs Eknath Shinde and Ajit Pawar arrives at Mantralay pic.twitter.com/nYER2J8QdF