‘एमपीएससी’चा मोठा निर्णय, अर्जापूर्वी ‘केवायसी’ सक्तीची!

    23-Jun-2025   
Total Views | 10

मुंबई :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) उमेदवारांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता एमपीएससीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी 'केवायसी' (ओळख पडताळणी) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही प्रक्रिया सोपी आणि सुरक्षित करण्यासाठी चार पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांना चार पर्यायांपैकी एक निवडावा लागेल. पहिला पर्याय आहे आधार ऑनलाइन ई-केवायसी, दुसरा आहे आधार ऑफलाइन पेपरलेस डिजिटल केवायसी, तिसरा आहे आधार ऑफलाइन पेपर आधारित केवायसी, आणि चौथा आहे नॉन-आधार ऑफलाइन केवायसी. अर्ज सादर करण्यापूर्वी ही पडताळणी करणे सक्तीचे आहे. याशिवाय, तुम्हाला फक्त एकदाच तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी प्रणालीत नोंदवावा लागेल. जर तुम्ही आधार निवडला, तर तुमचा मोबाईल नंबर आधारशी जोडलेला असणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांपासून, म्हणजे २०१७ पासून एमपीएससी ऑनलाइन प्रणालीत आधारचा वापर करत आहे.

फायदा काय

ही प्रणाली लागू केल्यामुळे उमेदवारांची ओळख अचूकरीत्या प्रमाणिकरण करता येणार असून, फसवणूक आणि चुकीच्या माहितीला आळा बसेल. विशेष म्हणजे, विशिष्ट ओळख प्राधिकरण (युआयडीएआय) आणि राज्य शासनाने एमपीएससीला अधिकृत मान्यता दिली असून, आता भरती प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षा यांच्या विविध टप्प्यांवर आधार प्रमाणीकरण वापरता येणार आहे.

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

'येरे येरे पैसा ३' मधील 'उडत गेला सोन्या' हे 'जेन झी' ब्रेकअप साँग प्रदर्शित!

'येरे येरे पैसा ३' या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. ट्रेलरला आणि टायटल ट्रॅकला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता या चित्रपटातील दुसरे गाणे 'उडत गेला सोन्या' प्रदर्शित झाले असून, त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. हे गाणे एका वेगळ्या आणि मनोरंजक पद्धतीने सादर करण्यात आले आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात सनी आणि बबलीचे गोड प्रेम प्रेक्षकांनी अनुभवले होते. परंतु आता 'येरे येरे पैसा ३' मध्ये सनीचे लग्न दुसऱ्याच मुलीशी होत असल्याने बबलीचे मन तुटले आहे. बबली तिच्या मनातील भावना ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121