गोंदण कलेच्या सर्वंकष संशोधनासाठी अभ्यासगट स्थापण करणार! - सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांचे निर्देश

    07-Jul-2025   
Total Views |

मुंबई: महाराष्ट्रात विविध भागात पारंपारिक गोंदणकला खूप प्राचीन काळापासून प्रचलित असून लोकसंस्कृतीचा भाग आहे. विवाह प्रसंगासह विविध उत्सवांमधे विविध धार्मिक चिन्हे शरीरावर गोंदून घेण्याची परंपरा राज्यात अनेक समाजांमधे आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानामुळे या कलेवर परिणाम होत आहे. मात्र पारंपारिक गोंदणकलेचा समावेश कला शिक्षण अभ्यासक्रमात करण्याकरता पावले उचलावीत तसेच गोंदणकलेच्या संदर्भातील सर्वंकष संशोधनासाठी एक अभ्यासगट तातडीने स्थापन करावा असे निर्देश आज सांस्कृतिक कार्य मंत्री एँड.आशिष शेलार यांनी नुकतेच दिले.

यावेळी सांस्कृतिक कार्य उप सचिव महेश वाव्हळ, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे, सह संचालक श्रीराम पांडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सह सचिव संतोष खारेगडे, कला संचालक किशोर इंगळे, यांच्यासह अन्य वरीष्ठ अधिकारी तसेच महाराष्ट्र गोंदणकला संस्कृती महामंडळाचे मच्छिंद्रजी भोसले, विश्वास दोर्वेकर आदींसह गोंदणकलाकारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गोंदणकला कलाकारांचे स्वप्न पुर्ण होणार

आमच्या चार पिढ्या गोंदनकलेचा वारसा जपत आहेत. गोंदनकला हे एक शास्त्र आहे. आजही गोंदणकलेमुळे हजारो नवयुवकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. उच्च शिक्षण अभ्यासक्रमात गोंदणकलेचा समावेश केल्यास हजारो नवयुवकांना एक पारंपारिक कला आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातून उपजीवीकेसाठी उपलब्ध होईल. गोंदणकेलचा वारसा जपला पाहिजे. मंत्री आशिष शेलार आणि युती सरकारने गोंदनकले संदर्भात घेतलेला निर्णय म्हणजे आमच्या गोंदणकला कलाकारांचे स्वप्न पुर्ण करणारा निर्णय आहे.

- विश्वास दोर्वेकर, गोंदणकला कलाकार



योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.