बीड जिल्ह्यातील आरती बोकरे या तरुणीने आपल्या मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत पास होत मोठ यश प्राप्त केले आहे. परळीच्या भीमनगर परिसरात राहणाऱ्या आरतीच्या घरची परीस्थिती एकदम हलाखीची, वडील हमालकाम करतात, अशा परिस्थितीत तिने एमपीएससीच्या परीक्षेत यश संपादन केले.
Read More
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) उमेदवारांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता एमपीएससीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी 'केवायसी' (ओळख पडताळणी) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही प्रक्रिया सोपी आणि सुरक्षित करण्यासाठी चार पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
राज्यात एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची योजना राज्य सरकार करत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, १२ मार्च रोजी विधानपरिषदेत दिली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससीची परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आयबीपीएस आणि एमपीएससीची राज्यसेवा पूर्व परीक्षा दि. २५ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी येत असल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनांनंतर एमपीएससीने संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
वर्ग 'क'ची सगळी पदं एमपीएससीच्या माध्यमातून भरण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच स्पर्धा परीक्षांसाठी नवा कायदा आणणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून लवकरच सुधारित परिक्षांच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार रजनीश सेठ यांनी प्रभारी अध्यक्ष डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्याकडून कोकण भवन, नवी मुंबई येथे स्विकारला. यावेळी आयोगाचे सदस्य डॉ.दिलीप पांढरपट्टे, डॉ.अभय वाघ, डॉ.सतिश देशपांडे, आयोगाच्या सचिव डॉ.सुवर्णा खरात, सहसचिव सुभाष उमराणीकर आदि उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी प्रकरणात झालेल्या टीकेवर आपली प्रतिक्रीया दिली आहे. नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला असल्याच म्हटलं आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत भरती केली जाणार आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून राज्यातील विविध विभागातील कार्यालयात भरती केली जाणार आहे. एकूण ३४५ रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. एमपीएससी अंतर्गत करण्यात येणाऱ्या भरतीद्वारे ‘सहाय्यक प्राध्यापक’ पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदभरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीकरिता उमेदवारास अर्ज हा ऑनलाईन पध्दतीने करावयाचा आहे. महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवामधील भरतीविषयक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
लग्नानंतर अभ्यासात अजिबात खंड न पडू देता, नोकरीसोबतच अभ्यासाचे नियोजन आखत, तब्बल सहा वर्षं मेहनत करून यश खेचून आणणार्या वंदना गायकवाड यांच्याविषयी...
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीच्या माध्यमातून महाराष्ट्र अन्न व औषध विभाग प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ अंतर्गत ही पदे भरली जाणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत भाषा संचालनालयातील अनुवादक मराठी गट-क आणि हिंदी अनुवादक गट-क या संवर्गातील ७ पदे भरली जाणार आहेत. या भरतीसंदर्भात महाराष्ट्र शासनाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयांतर्गत शासकीय महाविद्यालय, संस्थेतील विविध विषयांसाठी सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल ही रिक्त पदे भरली जाणार आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जात आहे. एमपीएससीअंतर्गत "अधिव्याख्याता" या पदाकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात (एमपीएससी)अंतर्गत मेगाभरती केली जाणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र गट -क सेवा मुख्य परीक्षा २०२३ द्वारे एकूण ७,५१० पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी अंतर्गत राज्यसेवा २०२२चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचा यंदाचा कट ऑफ जाहीर करण्यात आला असून यानुसार विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर या उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड होणार आहे. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर होईल.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग(एमपीएससी) यांच्यामार्फत राज्यातील विविध रिक्त पदे भरली जातात. राज्य शासनाच्या वतीने विविध रिक्त पदे भरण्यासाठी बंपर भरती केली जाईल. त्यामुळे स्पर्धा परीक्षांसाठी मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवी संधी शासनाकडून उपलब्ध होणार आहे. तसेच, एमपीएससीतर्फे भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांच्या संख्येत यंदा वाढ करण्यात आली आहे
महाराष्ट्र शासनाकडून २०१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गांतील रिक्त पदे भरण्यासाठी महाभरती जाहीर करण्यात आली होती. या महाभरतीसाठी जवळपास लाखोंच्या संख्येने अर्ज भरण्यात आले होते. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ही महाभरती करण्यात आली होती. परंतु, २०१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी त्यावेळी शुल्क भरलेले एकूण २१ कोटी ६७ लाख रुपये विद्यार्थ्यांना परत मिळणार असून याबाबत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी माहिती दिली आहे.
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या संवर्गाकरिता पूर्व परिक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे
सदाशिव पेठेतील MPSC परिक्षा देणाऱ्या तरुणीवर प्राणघातक हल्ला केल्याची माहिती मिळते आहे. पण तरुणीला वाचवणारा तरुण MPSC चा विद्यार्थी होता, असे समजते आहे. काही दिवसापूर्वी, राजगडाच्या पायथ्याशी MPSC उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हीच्या हत्येचं प्रकरण उघडकीस आले होते. यानंतर आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातुन तरुणीवर कोयत्याने हल्ला झाला.
एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या आणि वनाधिकारी बनलेल्या दर्शना पवारच्या खुनाचा मुख्य आरोपी तिचाच प्रियकर असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याला मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्थानकावरुन जेरबंद केले आहे. दर्शना एमपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर आईवडिलांनी तिचे लग्न अन्यत्र ठरविल्याने त्याने हा खून केल्याचे पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले. तिचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याला सतीचा माळ याठिकाणी आढळून आला होता.
एमपीएससी परीक्षेत यश प्राप्त करून अधिकारी झालेली तरुणी दर्शना पवार हिचा मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. डोक्यात आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली असल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी त्या दृष्टिने तपासाची चक्रे फिरवली आहेत.
ज्यांच्या ४० वर्षांच्या मार्गदर्शनाखाली ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी ‘सेट’, ‘नेट’, ‘जेआरएफ’ उत्तीर्ण झाले, असे राज्यभरात एक प्राध्यापकांची पिढीच घडविणारे प्रा. देविदास गिरी यांच्याविषयी...
“कोरोना आपत्तीच्या काळात ‘एमपीएससी’ची परीक्षा न झाल्यामुळे वयोमर्यादा उलटलेल्या तरुण-तरुणींना गट ‘ब’ आणि गट ‘क’ परीक्षेचे अर्ज करण्यासाठी लिंक खुली करावी,” अशी मागणी भाजपचे आ. निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत औचित्याच्या मुद्याद्वारे नुकतीच केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. "मी दिलेल्या गोष्टी कधी काढत नाही. त्यावर काही बोलणार नाही, मला बोलायला लावू नका, मी बोललो तर अनेकांची अडचण होईल. आम्हाला संपत्ती चा मोह नाही, कधीही नव्हता. आम्हाला कुणाचीही संपत्ती नको. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती." असं शिंदे म्हणाले.
मागील काही दिवसांपासून एमपीएससी विद्यार्थी आयोगाविरोधात आंदोलन करत होते. अखेर विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश आलं आहे. विद्यार्थी आंदोलकांना राष्ट्रवादी काँग्रेसच प्रमुख शरद पवार यांनी भेट दिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयोग, विद्यार्थी प्रतिनिधी यांचं बैठक घेण्याचं ठरलं होतं. ही बैठक आज नियोजित होती. मात्र बैठक न घेताच आयोगाने आज विद्यार्थ्यांच्या बाजुने निर्णय दिला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसुन येत आहे.
एमपीएससीसंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्तवाचे विधान केलेय. फडणवीस म्हणाले की, 'एमपीएससीसंदर्भात राज्य सरकारने तत्परतेने निर्णय घेऊन नवा पॅटर्न २०२५ पासून लागू करण्यासंदर्भात एमपीएससीला विनंती केली होती. तसेच महाराष्ट्रात एमपीएससी ही स्वायत्त संस्था आहे, आम्ही त्यांना निर्देश देऊ शकत नाही, विनंती करु शकतो. त्यांनी आमचे पत्र संपूर्ण सदस्यांपुढे ठेवले पण त्यांचे मत चालूवर्षीपासून पॅटर्न लागू करण्यासंदर्भात होते. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेरविनंती केली. त्यामुळे राज्य सरकारकडून स
राज्य सेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पर्यायांऐवजी वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे, या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता असून मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ च्या मुख्य परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांमधील सुमारे ८ हजार पेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी आज, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. लोकसेवा आयोगाच्या ८५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणातील पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून फक्त एकाच अर्जाद्वारे विविध संवर्गातील या भरती प्रक्रियेत उमेदवारांना सहभागी होता येणार आहे, असे आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितले.
दोन वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा आणि भरती प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यात याव्यात आणि मुलांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
दोन वर्षांपासून रखडलेल्या एमपीएससीच्या परीक्षा आणि भरती प्रक्रिया पुन्हा एकदा सुरु करण्यात याव्यात आणि मुलांचे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे
महाराष्ट्र राज्यात मविआ सरकार आल्यापासून राज्य शासनाने उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार या पदांच्या जागा काढल्या नाहीत. राज्य शासनाकडून उपअधिक्षक प्रमाणे दरवर्षी उपजिल्हाधिकारी, उपअधिक्षक, तहसीलदार सह इतर ३२ संवर्गाचे मागणीपत्रक जाणे अपेक्षित असताना राज्यसेवा २०२२ साठी शासनाने ८ संवर्गाचे फक्त १६१ जागांचे मागणीपत्रक पाठवले आहे. यामुळे ४ लाखांहून अधिक उमेदवार नाराज आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा २१ ऑगस्ट रोजी होणार आहे. १६१ पदांसाठी ही परीक्षा होणार असून संपूर्ण राज्यभरातून ३७ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे
परीक्षार्थी आणि वयोमर्यादा संपणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’ने मुदतवाढीसाठी रविवार, दि. २ जानेवारी रोजी होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले.
एकीकडे स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येचे प्रकरणावर वाद सुरु असतानाचा आणखी एका विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल
‘युपीएससी’-‘एमपीएससी’च्या परीक्षा उत्तीर्ण होणे, हे अनेकांचे स्वप्न असते. काही मोजकेच हे स्वप्न पूर्ण करू शकतात. पुण्याच्या मृणाली जोशीने हे स्वप्न वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी पूर्ण केले. आता सामाजिक कर्तृत्वाच्या दिशेने प्रवास करण्यास सुरुवात करणारी ही विद्यार्थिनीदुर्गा!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या तीन रिक्त पदांवरील नियुक्तीस राज्यपालांनी परवानगी दिली असून यात नाशिकचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांची वर्णी लागली आहे. दिघावकर यांच्यासोबत डॉ. देवानंद शिंदे आणि राजीव जाधव या अन्य दोन सदस्यांचाही समावेश करण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मान्यता दिल्यानंतर गुरुवारी राज्य सरकारने या विषयासंदर्भातील अधिसूचना जारी केली. तीन सदस्यांच्या नियुक्तीला मान्यता देण्याबाबत बुधवारी सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यपाल को
‘एमपीएससी’ अर्थात ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग.’ महाराष्ट्र सरकार घेत असलेली सर्वात मोठी परीक्षा. पण, सध्या ही परीक्षा उत्तीर्ण होऊनही कित्येक उमेदवारांना सरकारी सेवेत नियुक्ती मिळालेली नाही. त्यातच स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आला. तेव्हा यानिमित्ताने ‘एमपीएससी’चे वास्तव मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...
हिंसाचारी मानसिकतेच्या विद्यार्थ्यांसाठी शब्द खर्च करणार्या, फादर स्टेन स्वामीसारख्या शहरी माओवाद्याच्या नैसर्गिक मृत्यूला हत्या ठरवणार्या फादर दिब्रिटोंची स्वप्निल लोणकरच्या व्यवस्थेने केलेल्या हत्येवर दातखीळ का बसली आहे? की, फादर स्टेन स्वामीच्या मृत्यूची बातमी समजली तशी त्यांना स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येची बातमी समजली नाही?
आमदार निरंजन डावखरे यांची विधान परिषदेत मागणी
एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने जी आत्महत्या केली, ही दुर्दैवी आहे. या घटनेची राज्य सरकारने गंभीरतेने दखल घेतली आहे. काल रात्री उशिरापर्यंत मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यामध्ये हा विषय प्रामुख्याने चर्चेला घेण्यात आला. सरकार ३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार आहे, अशी घोषणा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
राज्यातील शेतकरी त्रस्त आहे, मराठा, ओबीसी राजकीय आरक्षणावरून राज्य सरकार दिशाभूल करीत आहे, एमपीएससीचे प्रश्नही प्रलंबित आहेत, कोरोना संकट काळात सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी अशा विविध मागण्यांसाठी विधिमंडळात आक्रमक भूमिका घेऊन मंत्र्यांचे भ्रष्टाचार, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, आरक्षणाचे रखडलेले प्रश्न यासह अनेक प्रश्नांवरून सरकारला जाब विचारणार असल्याचा असा इशाराही विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला.
एमपीएससीचा विद्यार्थी अमोल लोणकरच्या आत्महत्येनंतर अभिनेता प्रवीण तरडे यांचा संताप
‘एमपीएससी’चा कारभार गतिमान होऊन उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी ‘एमपीएससी’ सदस्यांच्या सर्व जागा ३१ जुलै २०२१ अखेरपर्यंत भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली.
ठाकरे सरकारच्या निष्क्रीयपणाचा बळी - स्वप्नील लोणकर
स्वप्नील लोणकर आत्महत्या प्रकरण राज्यातील तरुणांची मानसिक स्थिती दर्शवणारे एक विदारक उदाहरण आहे. मान्य आहे कोरोना आहे, सगळे ठप्प आहे.
वनविभागासारख्या पुरुषांची मक्तेदारी असणार्या क्षेत्रात एक सक्षम महिला वनाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री चंद्रकांत कीर यांच्याविषयी...
मागील वर्षी mpsc मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनेक यशस्वी भावी अधिकाऱ्यांना अजून नियुक्ती मिळालेली नाही . कित्येक महिने उलटले तरी अजून हातात नियुक्तीपत्र मिळत नाही म्हणून चिंतीत झालेल्या युवकांनी आता पुण्याच्या जिल्ह्धिकारी कार्यालयासमोर लोटांगण घातले आहे. आम्हास लवकरात लवकर नियुक्तीपत्र मिळावे अशी या युवकांची मागणी आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारकडून ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंधही लादण्यात आले. राज्यात पुढील काही दिवसांत ‘लॉकडाऊन’ची घोषणाही होऊ शकते. परंतु, या सर्व निर्णयांचा फटका जसा व्यापारीवर्गाला बसला, त्याप्रमाणेच विद्यार्थ्यांनाही बसलेला आहे. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लाखो विद्यार्थी आज अनिश्चिततेच्या उंबरठ्यावर उभे आहेत.