मुंबई : कोकण किनारपट्टीला सोमवार, दि. २३ जून रोजी सायंकाळी ५. ३० पासून दि. २५ जून रोजी रात्री ८.३० वाजेपर्यंत उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (आय.एन.सी.ओ.आय.एस.) लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. राज्यात पुढील २४ तासांत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात गेल्या २४ तासांमध्ये पालघर जिल्ह्यात ७३.३ मिमी पाऊस पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३६.४, रत्नागिरी २५.८ मिमी, ठाणे १४.३ आणि कोल्हापूर १३.९ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. रायगड १०.७, रत्नागिरी २५.८, नाशिक ६.२, धुळे ०.५, नंदुरबार २.९, जळगाव ०.९, अहिल्यानगर ०.२, पुणे ४.३, सोलापूर ०.१, सातारा ४.७, सांगली २.८, कोल्हापूर १३.९, छत्रपती संभाजीनगर १, जालना १.१, धाराशिव ०.२, नांदेड ०.३, हिंगोली ०.४, बुलढाणा १.१, अकोला ३.४, वाशिम ०.४ अमरावती ०.५, यवतमाळ ०.६, वर्धा ०.२, नागपूर १.५, भंडारा ०.६, गोंदिया १.७, चंद्रपूर २.५ आणि गडचिरोली जिल्ह्यात ६.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ठाणे जिल्ह्यात पुरात वाहून एक व खड्यामध्ये बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पुणे जिह्यात नदीत वाहून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.