मंत्री नितेश राणेंनी स्विकारला मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास खात्याचा पदभार!
24-Dec-2024
Total Views | 56
मुंबई : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मंगळवार, २४ डिसेंबर रोजी मंत्रालयात आपल्या खात्याचा पदभार स्विकारला. दरम्यान, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावाही घेतला.
यापूर्वी मंत्री नितेश राणे यांनी प्रभादेवी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच मंत्रालयात तळमजल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यानंतर मंत्रालयातील दालन क्रमांक २, मंत्रालय मुख्य इमारत या दालनात जाऊन पदभार स्वीकारला. यावेळी मत्स्य व बंदरे विभागातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन आढावा घेतला.