राहुल गांधी परभणीत दाखल! सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट

    23-Dec-2024
Total Views | 35
 
Rahul Gandhi
 
परभणी : काँग्रेस नेते राहुल गांधी हे सोमवार, २३ डिसेंबर रोजी परभणी दौऱ्यावर असून ते सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. दरम्यान, राहुल गांधींच्या दौऱ्यामुळे परभणीमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे नेतेही परभणीत दाखल झाले आहेत. 
 
नेमकी घटना काय?
 
परभणीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतीची एका व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेनंतर परभणीत मोठे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, या आंदोलनाला हिंसक वळण आले होते. त्यामुळे काही आंदोलकांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. यात सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचाही समावेश होता. मात्र, कोठडीत असतानाच सोमनाथ सुर्यवंशी यांचा अचानक मृत्यू झाला. त्यामुळे या मृत्यूनंतर अनेक तर्कवितर्क लावण्यात आले.
 
हे वाचलंत का? -  भुजबळांना मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने ओबीसी नेते नाराज! रस्त्यावर उतरण्याचा इशारा
 
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा चांगलाच गाजला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत आणि या संपुर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर आता राहुल गांधींनी सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली आहे. 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121