दिल्ली बॉम्बस्फोटाशी संबंधित असलेल्या उमर खालिदला जामीन मंजूर
न्यायालयाच्या " या" अटी आणि शर्थी लागू
18-Dec-2024
Total Views | 110
नवी दिल्ली : दिल्ली बॉम्बस्फोटाशी संबंधित असलेल्या दंगलीच्या कटाशी संबंधित प्रकरणात दिल्लीच्या कड़कड़डूमा न्यायालयाने जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद याला एकूण ७ दिवसांसाठी अंतरिम जामीन देण्यात आला आहे. खालिद .याला त्याच्या चुलत भावाच्या निकाहाच्या समारंभासाठी उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाने हा जामीन मंजूर करण्यात आला असल्याचे सांगितले गेले आहे.
२०२० साली दिल्ली येथील झालेल्या बॉम्बस्फोटाच्या हल्ल्यात उमर खालिदचा समावेश होता. दरम्यान या मिळालेल्या एका वृत्तानुसार, न्यायाधीश समीर वाजपेयी यांनी आदेश दिला की खालिद या कालावधीत कोणत्याही साक्षीदाराशी किंवा या प्रकरणाशी संबंधित व्यक्तीसोबत संपर्क साधणार नाही. सोशल मीडियाचा वापर करण्यासही त्याच्यावर बंधने लादण्यात आली आहेत. निकाहावेळी खालिद नातेवाईकांना भेटू शकतो.
दरम्यान निकाह सुरू असताना तो संबंधित निकाहाठिकाणी किंवा घरी राहणे अपेक्षित आहे. त्यानंतर त्याला ३ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी तुरूंग अधीक्षकांसमोर स्वत:ला आत्मसमर्पण करावे लागेल. अशी अट न्यायालयाने घातली असल्याचे सांगण्यात आले आहे.
Delhi | Umar Khalid, former student leader of JNU, has been granted interim bail to attend the marriage functions of his cousin. The Karkardooma court has approved the bail for a period of seven days for the purpose.
उमर खालिदला दिल्लीतील दंगलीचा कट रचल्याप्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. २०२० या वर्षात दिल्ली पोलिसांनी यूएपीए आणि आयपीसीच्या विविध कलमांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यांचा नियमित जामीन अर्ज याआधीही फेटाळण्यात आला असल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले होते.