आसामला भारतापासून तोडण्याचे वक्तव्य करणाऱ्याची बहीण झाली न्यायाधीश

इस्लामिक कट्टरपंथी म्हणाले आता न्याय होईल

    29-Nov-2024
Total Views | 215
 
separating Assam
पाटणा : सीसीए-एनआरसी विरोधात आसामचे भारतापासून विभाजन करण्याबाबतची माहिती सांगण्यात आली आहे. गेल्या ४ वर्षांपासून शरजील तुरूंगात असताना त्याची बहीण फराह निशात न्यायिक सेवा उत्तीर्ण झाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली. अशातच आता शरजीलची बहीण न्यायाधीश झाली असून आता अत्याचाराविरूद्ध न्याय देणार असल्याचे बोलण्यात आले आहे. सोशल मीडियावरील एका व्हायरल पोस्टवरून सांगण्यात येत आहे की, शर्जील इमामच्या भावाने सोशल मीडियावर आसामची भारतापासून विभागणी व्हावी अशी वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे.
 
शरजील इमामच्या भावाचे नाव मुझम्मील इमाम असे नाव असून सोशल मीडियावर त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. मुझम्मिलने आपल्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली. ते म्हणाले की, शरजील बहीण न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहे. आता त्यांच्याविरोधात न्याय देणार असल्याचे बोलले जात आहे.
 
 
 
संबंधित सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनुसार सांगण्यात आले की, बीपीएससी या वेबसाईटवर या परिक्षेचा निकाल तपासण्यात आला तेव्हा फराह निशातचे नाव मागासवर्गीय श्रेणीतील १२४५७० यादीत आढळले. मात्र ही मुलगी शरजील इमामची बहीण असल्याची अधिकृत पुष्टी आम्ही करू शकलो नाही, पण सोशल मीडियावर आणि मीडिया रिपोर्टनुसार दावा करण्यात आला आहे की, ही फरहा निशात शरजीलची बहीण आहे.
 
उल्लेखनीय बाब अशी आहे की, १०१९-२० मध्ये सीएए-एनआरसी विरोधी निदर्शनादरम्यान, मुस्लिमांना भडकवणे, दंगली भडकावणे आणि देशद्रोह यासारख्या गंभीर आरोपांनुसार शरजील इमामवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर २८ जानेवारी २०२० रोजी त्याला अटक करण्यात आली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. काही काळापूर्वी जामिया हिंसाचार प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. परंतु इतर आरोपांनुसार तो अजूनही तुरूंगात आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121