अंगणवाडी सेविकांच्या संपाबाबत उपमुख्यमंत्री फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया!

    09-Jan-2024
Total Views | 79

Fadanvis


मुंबई :
अंगणवाडी सेविकांच्या समस्या आम्ही वारंवार ऐकून घेतल्या असून त्यावर मार्ग काढण्याचाही सातत्याने प्रयत्न सुरु आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पुराच्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवून एकाचवेळी दोन्ही क्षेत्रांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अंगणवाडी सेविकांच्या समस्या आम्ही वारंवार ऐकून घेतल्या असून त्यावर मार्ग काढण्याचाही प्रयत्न सातत्याने सुरु आहे. हे सरकार आल्यानंतरच अंगणवाडी सेविकांना वेतनवाढ देण्यात आली, त्यांचा मोबाईलचा प्रश्न सोडवला आहे, त्यांच्यासाठी पेन्शन योजनादेखील तयार केली आहे. मागच्या सरकारच्या काळात तर त्यांची साधी बैठकही झाली नव्हती. वेगवेगळ्या संस्था वारंवार संप करत असल्याने मुलांवर याचा वाईट परिणाम होतो. याबाबत सरकार संवेदनशील आहे. परंतू, याचा उपयोग जर लोकं संप आणि आंदोलनाकरिता करत असतील तर ते योग्य नाही," असेही ते म्हणाले.
 
दरम्यान, कोल्हापूर आणि सांगली भागात पूर व्यवस्थापन प्रणाली राबवून पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी मराठवाड्याला देण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आखणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या प्रकल्पाला वित्तसहाय्य करण्यास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा दोन्ही भागांना त्यामुळे मोठा दिलासा मिळणार असून, फडणवीस यांनी याबद्दल जागतिक बँक, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121