मुंबई : स्वच्छता ही एक मोहीम नसून लोकचळवळ असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते म्हणाले, स्वच्छता ही प्रत्येकाच्या आरोग्याशी निगडीत असून यासाठी विद्यार्थी, प्रशासकीय यंत्रणा, सहकारी व सेवाभावी संस्था आणि नागरिक उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत. तसेच, डीप क्लीन ड्राईव्ह या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त होत आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
दरम्यान, स्वच्छता मोहीम ही फक्त एक मोहीम नसून हे जनतेचं अभियान असून मुंबईबरोबरच स्वच्छतेचे हे अभियान लवकरच संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई महापालिका आयुक्त आय एस चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, सुधाकर शिंदे, कोस्टल रोडचे मुख्य अभियंता स्वामी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.