धुळे येथे राम मंदिर प्रतिकृती! अनुप अग्रवाल यांचा उपक्रम

    28-Jan-2024
Total Views | 136

Dhule Ram Mandir


धुळे :
अयोध्या येथे श्री रामलल्ला मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने विधानसभा प्रमुख अनुप भैय्या अग्रवाल यांनीदेखील धुळे जिल्ह्यात अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती तयार करून धुळेकरांसाठी दर्शन सोहळा घडवून आणला. या सोहळ्यात किमान एक लाख भाविक सहभागी झाले होते.
 
अयोध्येतील राम मंदिरात प्रत्येक धुळेकराला उपस्थित राहणे शक्य नव्हते. परंतु, रामभक्त अनुप भैय्या अग्रवाल यांनी धुळेकरांसाठी पांझरा नदीच्या पात्रामध्ये अयोध्या मंदिराप्रमाणे प्रतिकृती तयार करून मूर्ती आणि मंदिराचे दर्शन घडवून भविकांना अयोध्येत असल्याचीच भावना निर्माण करून दिली.
 
अयोध्येत राम मंदिर व्हावे, असे प्रत्येक भारतवासीयाचे स्वप्न होते आणि ते स्वप्न २२ जानेवारी रोजी प्रत्यक्ष साकार झाले. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण धुळे शहर विद्युत रोषणाईने सजवले गेले. तसेच रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. २२ जानेवारी पासून सलग १० दिवस मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. सोहळ्याच्या दिवशी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्यात हजारो रामभक्त तल्लीन होऊन "जय श्रीराम" तसेच "जय हनुमान"चा जयघोष करत सहभागी झाले. भाविकांकडून रॅलीत फुलांचा वर्षाव करण्यात आला. रॅली मार्गात ठिकठिकाणी रांगोळ्या व स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. या पावन मुहूर्तावर घराघरात दिवाळी साजरी केली गेली.
 
अयोध्या राम मंदिर आंदोलनात सहभागी झालेले धुळे शहरातील कारसेवकांचा अनुप भैय्या अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या अनोख्या सोहळ्याची पर्वणी धुळेकरांना दिली, म्हणून विश्व हिंदू परिषद तसेच सकल हिंदू समाजाच्या महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक, भजनी मंडळ, मित्र परिवार तसेच संपूर्ण धुळेकरांकडून अनुप भैय्या अग्रवाल यांचे आभार मानून सत्कार केला जात आहे.
 
याप्रसंगी करक्यामचे आयोजक, भाजपचे धुळे विधानसभा प्रमुख अनुप भैय्या अग्रवाल आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, “२२ जानेवारी २०२४, सोमवार (पौष शुक्ल द्वादशी, विक्रम संवत २०८०, शके १९४५) या शुभ दिवशी रामजन्मभूमी अयोध्या येथे बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याची प्रत्येक रामभक्ताची इच्छा आहे. पण सगळ्यांनाच त्याच दिवशी अयोध्येत जाणं शक्य होणार नाही. त्यामुळे तसे वातावरण आपल्या शहरात आपल्या लोकांसाठी आपल्या परिसरात निर्माण करायचं असं मनात आलं. त्यामुळे पांझरा नदीच्या पात्रात अयोध्येतील पावन राम जन्मभूमी मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. धुळे जिल्ह्यातील आणि खानदेशातील राम भक्तांना राम मंदिराची अनुभूती घेता यावी यासाठी हे मंदिर उभारले आहे. अकरा दिवस विविध भव्य सांस्कृतिक कार्यक्रम धुळेकर जनतेसाठी योजले आहेत. तसेच या शुभ मुहूर्तावर संपूर्ण धुळे शहर लाइटिंगने सजवण्यात येणार आहे.
 
प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ही सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले यासाठी मी स्वतःला भाग्यशाली समजतो.” अशी भावना अनूपभैय्या अग्रवाल यांनी व्यक्त केली. अयोध्या राम मंदिर आंदोलनात सहभागी झालेले धुळे शहरातील कारसेवक यांचा ही अनुप आगरवाल यांच्या हस्ते सत्कार केला गेला. या अनोख्या सोहळ्याची पर्वणी धुळेकरांना दिली म्हणून विश्व हिंदू परिषद तसेच सकल हिंदू समाजाच्या महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक, भजनी मंडळ, मित्र परिवार तसेच संपूर्ण धुळेकरांकडून अनुप अगरवाल यांचे आभार मानून सत्कार केला जात आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121