गोपीचंद पडळकरांचा पवारांवर निशाणा; म्हणाले, "त्यांनी लक्ष्यद्वीप समुद्रात डुबकी मारली तर..."

    16-Jan-2024
Total Views | 134

Sharad Pawar & Gopichand Padalkar


सांगली :
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका फोटोमुळे अख्खा मालदीव देश कामाला लागला, एवढी त्यांच्यात ताकत आहे. पण असच काही जर शरद पवारांनी केलं असतं तर काही फरक पडला असता का? असे म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला आहे. ते सांगली येथे महायुती जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
 
गोपीचंद पडळकर म्हणाले की, "मालदीच्या राष्ट्रप्रमुखाने निवडणुकीत भारत आऊट अशी घोषणी दिली आणि चीनच्या मांडीवर जाऊन बसले. मोदीजी यावर चकार शब्दही बोलले नाहीत. त्यानंतर एक दिवस अचानक मोदीजींचा एक फोटो आला ज्यात त्यांनी लक्ष्यद्वीपला भेट दिली होती. हा फोटो पुढे आल्यानंतर अख्खा मालदीव कामाला लागला. सगळे गुडघ्यावर येऊन माफी मागायला लागले. कारण मालदीवची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे आणि याच पर्यटनाला भारताचे ५० टक्के लोक जात असतात. त्या सर्व लोकांनी तिथले बुकींग रद्द केले. ही आपल्या नेतृत्वाची ताकद आहे."
 
ते पुढे म्हणाले की, "देशात असा एक तरी नेता आहे का ज्याने एक फोटो काढला आणि अख्खा देश कामाला लागला. समजा जर शरद पवारांनी तिथल्या समुद्रात जाऊन डुबकी मारली असती तर काही फरक पडला असता का?" असा सवाल करत त्यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला. तसेच जे लोक मोदींच्या विरोधात बोलतात ते त्यांचं काहीही करु शकत नाही. कारण मोदी साहेबांमध्ये जो प्रामाणिकपणा, हिमंत आणि धमक आहे ती इतर कुठल्याच नेतृत्वात नाही, असेही ते म्हणाले आहेत.



अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121