अपात्रता सुनावणीवर शिंदेंनी स्पष्ट सांगून टाकलं! "मुख्यमंत्री राहिलेला माणूस अशी भाषा!...

    10-Jan-2024
Total Views |
eknath shinde 1
 
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल आज १० जानेवारी २०२४ ला दुपारी चार वाजता जाहीर केला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी कायद्याला धरुन निकाल देणार असल्याच आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही याप्रकरणी आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे. निकालापूर्वी राहूल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावर होत असलेल्या टीकेलाही शिंदेंनी उत्तर दिले आहे.
 
निवडणुक आयोगाने शिवसेना पक्ष अधिकृतरीत्या आम्हाला दिला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह देखिल आम्हाला दिले आहे. बहुमतही आमच्याच बाजुने आहे. लोकशाहीमध्ये बहूमतालाच महत्व असते असे मुख्यमंत्री म्हणाले. आमच्याकडे विधानसभेत आणि लोकसभेतही बहुमत आहे असही ते यावेळी म्हणाले.
 
उद्धव ठाकरे यांनी राजिनामा दिला होता आणि त्यामुळे कोणतेही सरकार अस्तीत्वात नव्हते. त्यानंतर आम्ही आमचे ४० आणि भाजपचे १०६ आमदारांच्या पाठींब्याने सरकार स्थापन केले होते. त्यामुळे हे सरकार घटनाबाह्य नाही हे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे विरोधकांनी उगाच अकलेचे तारे तोडू नयेत असही ते म्हणाले.
 
उद्धव ठाकरे यांनी आरोपी नार्वेकरांना भेटले असा आरोप केला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की " हा गुन्हागारी खटला नाही दिवाणी खटला आहे त्यात कोणीही आरोपी नसतो. मुख्यमंत्री राहीलेला व्यक्ती अशाप्रकारची वक्तव्य कशी करु शकतो. पराभवाच्या भीतीने ते अशी वक्तव्य करत आहेत''.
 
राहूल नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत काय घडले ?
राहूल नार्वेकर आपल्या अधिकृत गाडीतून आले होते ते अंधारात लपून छपून आले नव्हते. राहूल नार्वेकर हे आमदारही आहेत आपल्या मतदारसंघातील विकासकामांचीही त्यांच्यावर जवाबदारी आहे. त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी ते आले होते. अस मुख्यमंत्र्यांनी म्हटल आहे. विरोधकांना पराभव समोर दिसत आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमिन सरकली आहे. असही त्यांनी म्हटलं आहे.
 
दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर हिवाळी अधिवेशनावेळी मॅरेथॉन सुनावणी घेण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने यावर ३१ डिसेंबर पर्यंत निकाल देण्याचे आदेश अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना दिले होते. राहूल नार्वेकर बुधवारी १० जानेवारीला संध्याकाळी चार वाजता यावर निकालाचे वाचन करणार आहेत. या निकालावर शिवसेना पक्ष आणि उबाठा गटाते राजकीय भवितव्य अवलंबून आहे. हा निकाल सर्वांना लाईव्ह पाहता येणार आहे अस राहूल नार्वेकर यांनी सांगितलं आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121