मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान संभाजी आणि शिवराय नाते जीवा शिवाचे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ लेखक, तथा इतिहासकार विश्वास पाटील यावेळी श्रोत्यांना मार्गदर्शन करणार आहेत. गुरुवार दि. ५ जून रोजी सायंकाळी ५:३० वाजता वांद्रयाच्या नॅशनल लायब्ररी येथे हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सर्व सभासदांनी तसेच शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने या व्याख्यानाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक नॅशनल लायब्ररी वांद्रेचे अध्यक्ष दिपक पडवळ, कार्याध्यक्ष राजेंद्र लाड, कोषाध्यक्ष उर्मिला रांगणेकर आणि प्रमुख कार्यवाह प्रमोद महाडिक यांच्यावतीने करण्यात आले आहे.