
रुपया अवमूल्यनाचा धोका टाळण्यासाठी आरबीआयने उचलले महत्वाचे पाऊल
रिझर्व्ह बँकेने उर्वरित घसरण टाळण्यासाठी NDF मार्फत हस्तक्षेप सुरू केला.
रॉयटर्स : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अनेकदा NDF ( Non Deliverable Forward) वर लक्ष ठेवून असते. ज्याच्यामुळे रुपयाचे मूल्य मर्यादेपेक्षा उतरणार नाही यासाठी रिझर्व्ह बँक उपाययोजना करते असे बँकर्सने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितले आहे. परंतु आज सकाळी ११.१६ वाजेपर्यंत रुपयांचे मूल्य एक डॉलर प्रती ८३.१५२५ इतके होते. यापूर्वी ऑक्टोबर २०२२ मध्ये ८३.२९ पर्यंत रुपयाची घसरण झाली होती. म्हणूनच ' आरबीआयने आज सकाळी NDF संदर्भात मध्यस्थी करण्यास सुरुवात केली आहे. कालही आरबीआयने यासाठी प्रयत्न केले आहेत.' असे एका खाजगी बँकेच्या ट्रेझरी विभागाचे प्रमुख यांनी रॉयटर्स ला सांगितले आहे.
त्यांनी पुढे सांगितल्याप्रमाणे, आरबीआय बँक ऑफ इंटरनॅशनल सेंटलमेंट ( BS) च्या माध्यमातून NDF' s साठी प्रयत्न करत आहे. गुंतवणूकदार हे NDF ' विदेशी डॉलर सेटल करन्सी डेरीएटिव' मार्फत व्यवहारासाठी अंदाज लावत असतात. असे रॉयटर्सला सुत्रांनी सांगितले.
बुधवारी अमेरिकेच्या ट्रेडिंग तासांदरम्यान, 1 महिन्यांचा यूएसडी / आयएनआर एनडीएफ 83.44 इथपर्यंत वाढला होता. अमेरिकेन सेवेचा डेटानंतर सुमारे 83.35 स्पॉट दर आहे. गुरुवारी स्थानिक ओटीसी मार्केट उघडेपर्यंत कॉन्ट्रॅक्ट दर 83.20 पर्यंत मागे गेला होता. व स्पॉट दर 83.12 वर उघडला होता. एनडीएफव्यतिरिक्त मध्यवर्ती बँक स्थानिक ओटीसी मार्केटमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमार्फत डॉलरचा पुरवठा करण्याची शक्यता आहे, असे व्यापाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितले.