16 मंत्रालयांनी (पीएमजीएस-एनएमपी) प्लॅटफॉर्मवर आपली आकडेवारी केली एकत्रित

    05-Aug-2023
Total Views | 33
PM Gati Shakti
 
 
 
 16  मंत्रालयांनी  (पीएमजीएस-एनएमपी) प्लॅटफॉर्मवर आपली आकडेवारी केली एकत्रित
 
 
 

नवी दिल्ली :  केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, आरोग्य आणि पंचायती राजसह सामाजिक क्षेत्रातील 16 मंत्रालयांनी आतापर्यंत पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन (पीएमजीएस-एनएमपी) प्लॅटफॉर्मवर आपली आकडेवारी एकत्रित केली आहे. लॉजिस्टिक वरील खर्च कमी करण्यासाठी व एकत्रित पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी 2021 मध्ये हे व्यासपीठ सुरू करण्यात आले होते.
 
 
देशातील प्रभावी आणि इंटिग्रेटेड पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तंत्रज्ञानावर आधारित साधन तयार करण्याचा सरकारचा मानस आहे.सामाजिक क्षेत्राच्या नियोजनात एनएमपीचा व्यापक अंमलबजावणी साठी सामाजिक क्षेत्रातील मंत्रालयांनी आवश्यक ती कार्यवाही करण्यावर भर दिला‌ हे यातून स्पष्ट होते.
 
 
या कृतीने आवश्यक त्या माहितीचा भाग एनएमपीशी जोडण्यासाठी व योजना, कार्यक्रम पीएमजीएसशी जोडण्यास शक्य होईल.तळागाळातील स्तरावर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी याचा उपयोग होईल.
 
 
प्राथमिक आरोग्य केंद्रे, डम्पिंग साईट, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, सार्वजनिक स्वच्छतागृहे, मेळावे, डेअरी ठिकाणे अशा पायाभूत सुविधांशी संबंधित ८७ डेटा लेअर्सएनएमपीवर मॅप तयार करण्यात आले आहेत.
 
 
उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाच्या (डीपीआईआईटी) १ ऑगस्ट रोजी झालेल्या आढावा बैठकीत या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली आहे.या बैठकीला सामाजिक क्षेत्रातील २२ मंत्रालयांचे ५० हून अधिक अधिकारी सहभागी झाले होते.
 
डीपीआयआयटीचे सचिव राजेश कुमार सिंह यांनी सामाजिक क्षेत्राच्या नियोजनात व्यासपीठाची अफाट उपयुक्तता आणि त्याचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा स्तरावर प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित केली.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121