शिल्पा शेट्टी नव्या रुपात मजेदार मनोरंजन करण्यासाठी सज्ज !

    23-Aug-2023
Total Views | 56

sukhi movie
 
 
 मुंबई : नवोदित दिग्दर्शिका सोनल जोशी दिग्दर्शित 'सुखी' चित्रपटातून अभिनेत्री शिल्पा शेट्टी वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.   बहुचर्चित शेरनी, छोरी आणि जलसा, टी-सीरीज आणि अबंडंटिया एंटरटेनमेंटच्या निर्मात्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
एअरलिफ्ट, शेरनी, छोरी आणि जलसा यांसारख्या ब्लॉकबस्टर्सवरील यशस्वी सहकार्यानंतर, टी-सिरीझ आणि Abundantia Entertainment मजेदार मनोरंजनासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले असून 'सुखी' हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्याची घोषणा त्यांनी केली. 
 
सुखी ही एक ३८ वर्षीय पंजाबी गृहिणी असून हा चित्रपट सुखी आणि तिच्या मैत्रिणींची कथा सांगतो.  सर्व मैत्रिणी २० वर्षांनंतर शाळेच्या रियुनियनसाठी दिल्लीत भेटतात. आणि आपल्या कथा सांगत जातात असे या चित्रपटाचे कथानक आहे. सुखी ही प्रत्येक स्त्री ची गोष्ट आहे. अनेक अनुभवांच्या आणि भावनांच्या भरात असताना आणि तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण स्थित्यंतर - एक पत्नी आणि आई होण्यापासून ते पुन्हा एक स्त्री होण्यापर्यंतच्या १७ वर्षांच्या जुन्या सुखीला पुन्हा जिवंत करते.
 
हा चित्रपट सोनल जोशींचा दिग्दर्शकिय पदार्पण चित्रपट असून भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा ​​आणि शिखा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यात शिल्पा शेट्टीने कुशा कपिला, दिलनाज इराणी, पावलीन गुजराल, चैतन्य चौधरी आणि अमित साध यांच्यासोबत कधीही न पाहिलेल्या भूमिका बघायला मिळणार आहेत. चित्रपटाचे लेखन राधिका आनंद यांनी केले असून पटकथा पाउलोमी दत्ताने लिहिली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
राज्यात १ लाख ३५ हजार ३७१ कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा समावेश

राज्यात १ लाख ३५ हजार ३७१ कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा समावेश

राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी बुधवारी उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीने राज्यातील थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या १ लाख ३५ हजार ३७१ कोटी ५८ लाख रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता दिली. यामुळे राज्यात सुमारे १ लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन, विकास व रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले...

‘न्यू इंडिया’चे विलीनीकरण सप्टेंबर आधीच मार्गी लागणार; सारस्वत बँक, सर्व ठेवीदारांना पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही

‘न्यू इंडिया’चे विलीनीकरण सप्टेंबर आधीच मार्गी लागणार; सारस्वत बँक, सर्व ठेवीदारांना पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही

घोटाळ्यात सापडलेल्या ‘न्यू इंडिया को‑ऑपरेटिव्ह बँके’चे विलीनीकरण सारस्वत बँकेमध्ये येत्या ऑगस्ट‑सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे. सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, या प्रक्रियेत कोणत्याही गुंतवणूकदाराचे नुकसान होऊ देणार नाही. ठाकूर म्हणाले, “सर्व गुंतवणूकदारांना कोणत्याही रकमेचे नुकसान न होता मुलभूत रक्कम मिळेल.” सध्याच्या परिस्थितीत, ज्यांना त्यांच्या खात्यातून एकावेळी २५ हजार पेक्षा जास्त रक्कम काढता येत नाही, त्यांना विलीनीकरणानंतर त्यांच्या पूर्ण रकमेची खात्री दिली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121