'ISRO'ची अतुलनीय कामगिरी; सिंगापूरच्या सात उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

    30-Jul-2023
Total Views | 124
ISRO to launch Singapore's earth observation satellite

श्रीहरीकोटा
: भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ची कामगिरी सातत्याने उंचावत असून सिंगापूरच्या सात उपग्रहांचे प्रक्षेपण करुन ‘इस्त्रो’ने आपल्या कामगिरीचा आलेख आणखीनच उंचावला आहे. सिंगापूरच्या ’डीएस-एसएआर’ या उपग्रहासह अन्य सहा उपग्रहांना ‘इस्रो’च्या पीएसएसलव्ही-५6 रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपित करण्यात आले. पीएसएलव्हीने उड्डाण केल्यानंतर अवघ्या अवघ्या २५ मिनिटांत सर्व उपग्रहांना त्यांच्या कक्षेत पोहोचवण्यात आले. श्रीहरीकोटा येथे असणार्‍या सतीश धवन अवकाश केंद्राच्या पहिल्या लाँच पॅडवरुन हे प्रक्षेपण यशस्वीरित्या झाले आहे. ही एक पूर्णपणे व्यावसायिक मोहीम आहे. न्यूस्पेस इंडिया लिमिटेड ही या मोहिमेचे संचालन करत आहे. ही संस्था अवकाश मंत्रालयाच्या अंतर्गत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

‘इस्त्रो’ने केलेल्या या कामगिरीत सर्वात महत्त्वाचा उपग्रह हा सिंगापूरचा डीएसएएसआर हा आहे. सिंगापूर सरकारच्या विज्ञान, संरक्षण आणि तंत्रज्ञान संस्था आणि सिंगापूरमधील एसटी इंजिनिअरिंग यांनी संयुक्तपणे हा उपग्रह विकसित केला असून त्याचा उपयोग व्यावसायिक वापरासाठी असणार आहे.

दरम्यान या उपग्रहासोबत पाठविण्यात आलेल्या अन्य उपग्रहात व्हेलॉक्स-एएम - हा एक तंत्रज्ञानदर्शक सूक्ष्म उपग्रह आहे. टमॉस्फेरिक कपलिंग अँड डायनामिक्स एक्स्प्लोरर - हा एक प्रायोगिक उपग्रह आहे. स्कूब-२ - हा एक ३ यू हा नॅनो उपग्रह आहे. नूलियन - हा उपग्रह शहरी आणि दुर्गम ठिकाणी अखंड ’आयओटी’ कनेक्शन पुरविण्यास सक्षम आहे. हादेखील ३यू नॅनो उपग्रह प्रकारात मोडतो. ‘क्लासिया-२’ आणि ’ओआरबी-१२ स्ट्रायडर’ - या उपग्रहांची आंतरराष्ट्रीय सहकार्याने निर्मिती करण्यात आली आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121