महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. नितीन पाटील

    29-Jul-2023
Total Views |
Maharashtra Animal and Fisheries Science University

मुंबई
: केंद्रीय कृषी संशोधन परिषदेच्या जोधपूर येथील केंद्रीय शुष्क क्षेत्र संशोधन संस्था येथे मुख्य शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ. नितीन वसंतराव पाटील यांची नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी डॉ.नितीन पाटील यांची कुलगुरुपदी नियुक्ती केली.

डॉ.नितीन पाटील यांनी अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातून पशुवैदयकीय विज्ञान या विषयात पदव्युत्तर पदवी तसेच राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था कर्नाल येथून पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यांना अध्यापन, संशोधन व विस्तार कार्याचा व्यापक अनुभव आहे.

'माफ्सू'चे कुलगुरु डॉ.आशिष पातूरकर यांचा कार्यकाळ दिनांक २१ जानेवारी २०२३ रोजी संपल्याने विद्यापीठाचे कुलगुरुपद रिक्त झाले होते. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

कुलगुरु नियुक्तीसाठी राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आर.के. अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित केली होती. केंद्रीय मत्स्य विज्ञान शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.रविशंकर सी. एन. व पदुम विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता हे कुलगुरु निवड समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. नितीन पाटील यांची निवड केली. 


अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121