मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महा एनजीओ फेडरेशनतर्फे राज्यभरात वृक्षारोपण करण्यात आले असून राज्यभरातील संलग्न असलेल्या ५३ एनजओंच्या वतीने महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली ५३ ठिकाणी ५३ वृक्ष लागवड संकल्प करण्यात आला आहे अशी माहिती महा एनजी फेडरेशनचे कार्यकारी संचालक अक्षय महाराज भोसले यांनी दिली.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस २२ जुलै २०२३ रोजी साजरा झाला या निमित्ताने भाजपकडून राज्यभर विविध कार्यक्रम, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने श्रीआनंदऋषीं वन येथे वृक्षारोपण करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिम्मित सेवा उपक्रम मागील ५ वर्षापेक्षा अधिक काळ महा एनजीओ फेडरेशन राबवित आहे व समाजातील नानाविध घटकांना याचा विशेष लाभ होतो. यावेळी संस्थापक शेखर मुंदडा, संचालक मुकुंद शिंदे, अमोल उंबरजे, कार्यकारी संचालक अक्षयमहाराज भोसले , अपूर्वा करवा, विठ्ठल काळे उपस्थित होते.