‘रडायला तयार राहा..’, विवेक अग्निहोत्रींची पोस्ट चर्चेत

    19-Jul-2023
Total Views | 85

the kashmir files




मुंबई :
बहुचर्चित ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाने संपुर्ण चित्रपटसृष्टी आणि जनजीवन हादरवून टाकले होते. या वर्षी मार्चमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आणि करोना काळानंतर उत्तम कामगिरी करणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरला. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द कश्मीर फाईल्स या चित्रपटाचा आणखी एक भाग ‘द कश्मीर फाईल्स अनरिपोर्टेड' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 
विवेक अग्निहोत्रींनी आपल्या ट्विटरवरून याबाबतची घोषणा केली आहे. अनेक नरसंहार नाकारणारे, दहशतवादी समर्थक आणि भारताच्या शत्रूंनी काश्मीर फाइल्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आता तुमच्यासमोर काश्मीर हिंदूंच्या नरसंहाराचे असभ्य सत्य आणत आहे ज्यावर फक्त एक शैतानच प्रश्न करू शकतो. ‘रडायला तयार राहा’ असं म्हणत अग्निहोत्री यांनी चित्रपटाचा एक छोटासा टीझरही प्रदर्शित केला आहे. हा चित्रपट झी५ वर लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता या पुढच्या भागात काय पाहायला मिळणार आणि त्याचे राजकीय, सामाजिक पडसाद काय उमटणार हे येणारा काळच ठरवेल.
 
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. काहींनी या चित्रपटाचं कौतुक केलं होतं तर काहींनी यावर टीकाही केली होती. त्यात काश्मिरी पंडितांचे स्थलांतर, त्यांना करावा लागलेला संघर्ष आणि त्यांच्या वाटेला आलेला अपमान याविषयीचे विदारक चित्रण करण्यात आले होते. देशभरातून काश्मिर फाईल्सला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यावरुनही वादही तेवढ्याच प्रमाणात झाला होता.

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121