कन्नड दिग्दर्शकाला विजय तेंडूलकरांच्या 'पाहिजे जातीचे' नाटकाची भूरळ

    18-Jul-2023
Total Views | 54
 
pahije jatiche





मुंबई :
प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांचे शिक्षण आणि जातीय संस्थेवर भाष्य करणाऱ्या ‘पाहिजे जातीचे’ या नाटकावर आधारित पाहिजे जातीचे हा चित्रपट ४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे. मुख्य म्हणजे हा चित्रपटाचे दिग्दर्शन कन्नड दिग्दर्शक कब्बडी नरेंद्र बाबू यांनी केले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या सोहळ्यदरम्यान विजय तेंडूलकरांच्या पाहिजे जातीचे या नाटकाचे १०० हून अधिक प्रयोग कन्नडमध्ये केल्याची माहिती दिग्दर्शक कब्बडी बाबू यांनी दिली. आणि तेव्हापासूनच या नाटकावर चित्रपट करावा हे डोक्यात होते असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘वाचायला शिका, विचार करायला शिका आणि महत्त्वाचे म्हणजे प्रश्न विचारायला शिका’ हे विचारसूत्र घेऊन तेंडुलकरांनी हे नाटक लिहिले होते. 
 
‘पाहिजे जातीचे’ हे तेंडुलकर यांचे नाटक १९७२ आणि १९७५ च्या काळात गाजले होतेया नाटकाच्या तालमी मी पाहिल्या होत्या. नाटकाचे जेव्हा चित्रपटात रुपांतर होते, तेव्हा त्याच लेखकाने तो चित्रपट लिहिला तर तो संदेश योग्यरीत्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो. विषय मांडण्यामागची तळमळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. मात्र जेव्हा नवीन लेखक तो विषय हाताळतो तेव्हा त्याचे विचार आणि मूळ लेखकाचे विचार जुळणे फार गरजेचे असते, असे अभिनेते सायजी शिंदे यांनी या चित्रपटाची झलक प्रकाशनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सांगितले.
 
‘पाहिजे जातीचे’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्याबरोबर संजना काळे, विक्रम गजरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा ही एका लहान गावातील महिपती या होतकरू आणि महत्त्वाकांक्षी तरुणाभोवती फिरते. शिक्षक होऊ पाहत असलेल्या या तरुणाची जातीय भेदभावामुळे झालेली हेळसांड या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121