'यूसीसी'मुळे एका धर्माच्या प्रथा दुसऱ्या धर्मावर लादणार! ; मेघालयमधील कॅथोलिक चर्चचा अजब दावा

    16-Jul-2023
Total Views | 53
Meghalaya Catholic Church On UCC

मेघालय
: देशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या केंद्राच्या हालचालींमुळे विविध धर्म, पंथ संघटनांकडून वक्तव्ये केली जात असून ईशान्येतील एका चर्चने याला विरोध केला आहे. शिलाँग येथील कॅथोलिक चर्चने कायदा आयोगाला पत्र लिहून यूसीसीवर तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. त्यांनी पत्रात नमूद केले आहे की, 'यूसीसी'मुळे एका धर्माच्या प्रथा दुसऱ्या धर्मावर लादल्या जाण्याचा धोका संभवतो, असा आक्षेप आहे. तसेच, मेघालयातील काही मुस्लिम संघटनांचाही या विधेयकाला विरोध असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, चर्चने विधी आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, समान नागरी संहिता आदिवासी समुदायांना सशक्त करणारे विशेष अधिकार आणि तरतुदी काढून घेईल. तसेच, देशात युसीसी लागू करण्याची इतकी घाई केंद्र सरकार कशासाठी करत आहे, अशी विचारणाही या पत्राद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित विभाग आणि भारत सरकारला देशात युसीसी लागू करू नये अशी मागणी चर्चकडून केली जात आहे.

दरम्यान, नागालँड सरकारचे प्रवक्ते आणि मंत्री के. जी. केन्ये यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते, "अमित शाह यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की, केंद्र सरकार २२ व्या कायदा आयोगाच्या कक्षेतून ख्रिश्चन आणि काही आदिवासी भागांना वगळण्याचा विचार करत आहे", असे त्यांनी सांगितले. तसेच, भारताच्या पूर्वेकडील राज्यांत विशेषतः मेघालय, मिझोराम आणि नागालँडमधून यूसीसीला सर्वात तीव्र विरोध झाला असून ही राज्ये ख्रिश्चन बहुसंख्य आहेत.

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121