ज्योती मौर्यचं मनीष दुबेशी अफेअर! नोकरी जाणार?

    12-Jul-2023
Total Views | 747
PCS Officer Jyoti Maurya Affair Case

नखनऊ
: पीसीएस अधिकारी ज्योती मौर्य प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली असून महोबाचे होमगार्ड जिल्हा कमांडंट मनीष दुबे हे विभागीय चौकशीत दोषी आढळले आहेत. या चौकशीनंतर विभागाची प्रतिमा डागाळल्याबद्दल डीआयजीने दोषी ठरवले असून त्यांच्यावर निलंबनाची शिफारस करण्यात आली आहे. तसेच, या चौकशी अहवालाच्या आधारे मनीष दुबे यांच्या निलंबनाची शिफारस करण्यात आली आहे. तपास अहवाल आता सरकारला पाठवण्यात येणार असून, त्यानंतर मनीष दुबेवर कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे.

मनीष दुबे हे पीसीएस अधिकारी ज्योती मौर्य प्रकरणात विभागीय चौकशीत दोषी आढळले आहेत. चौकशीनंतर मनीष दुबे यांच्या निलंबनाची शिफारस करण्यात आली आहे. दरम्यान,पीसीएस अधिकारी ज्योति मौर्य आपल्या कथित अफेअरमुळे चर्चेत होत्या. त्यानंतर आता त्यांचे पती आलोक मौर्य यांनी एक आरोप केला असून होमगार्ड जिल्हा कमांडंट मनीष दुबे यांच्याशी त्यांचे अफेयर सुरु आहे, असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, मीडियाच्या अहवालानुसार, पीसीआय अधिकारी मौर्या यांच्या कथित अफेयरच्या चर्चा सुरु असतानाच आता त्यांच्या पतीने केलेल्या आरोपामुळे याप्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. त्यांच्या पतीने म्हटले की, आपली पत्नी आणि तिचा कथित प्रियकर हे दोघे मिळून आपल्या हत्येचा कट रचत असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर आता होमगार्ड मनीष दुबे हे चौकशीदरम्यान दोषी आढळले आहेत.

तसेच, मनीष दुबे याच्यावर याआधीच तीन प्रकरणांत आरोप आहेत, त्यातील एक प्रकरण हे ज्योती मौर्य यांच्याशी संबंधित आहे. तर दुसरे प्रकरण हे त्यांच्या पत्नीचे असून, त्यांच्यावर हुंडा घेतल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. दरम्यान, पीसीएस अधिकारी ज्योती मौर्य प्रकरणात विभागीय चौकशीत दोषी आढळले आहेत. चौकशीनंतर मनीष दुबे यांच्या निलंबनाची शिफारस करण्यात आली आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121