पुणे : सदाशिव पेठ भागातील तरुणीवर हल्ला झल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर हल्ला करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली होती. मात्र, या घटनेनंतर आता पोलीस आयुक्तांनी मोठी कारवाई केली आहे. इतरवेळी पुण्यात वेळोवेळी गस्त घालणारे पोलीस ही घटना घडली तेव्हा कुठे होते असा प्रश्न उपस्थित केला जात असताना पोलीस आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे.
पेरूगेट पोलीस चौकीतील तीन पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे. हल्ला झाल्यानंतर लोक आरोपीस पकडून घेऊन पेरूगेट पोलीस चौकीला गेले असता तिथे एकही पोलीस हजर नव्हते. जवळपास अर्धा तास उलटल्यानंतर पोलीस आल्यानं तीन जणांवर ही कारवाई केली जात आहे.