इस्लामिक दहशतवादी संघटना हमासची वकीली करणाऱ्यांना कायदेशीर दणका

भाजपचे पुणे शहर पदाधिकारी व राजे शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक महेश पवळे यांनी केला गुन्हा दाखल

    13-May-2025
Total Views | 90


BDS Movement in Pune

पुणे : (BDS Movement in Pune) काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीयांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घालून मारण्यात आले. राष्ट्रीय माध्यमांवर पाक व्याप्त काश्मीर येथे हमास या दहशतवादी संघटनेचे कनेक्शन बाबत बातम्या आल्या. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ला हमास स्टाईल असल्याचे वृत्त झळकले. पुढे 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारताने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणे हवाई हल्ले करून उडवले. युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली. दि. १० मे २०२५ रोजी BDS movement नावाने काही संशयित लोकांनी कर्वेनगर भागात पॅलेस्टीन समर्थनार्थ निदर्शने करताना थेट हमास चे उदात्तीकरण करणारी पत्रके वाटली.

हे वाचलंत का? : विनय ना मानत जलध जड़ गए तीन दिन बीति। बोले राम सकोप तब भय बिनु होय ना प्रीति

याबाबत त्यांना जाब विचारला असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे देण्यात आली. आज आपण पाकिस्तानचा निषेध करून भारत सरकारच्या सोबत उभे राहिले पाहिजे असे सांगितले असता त्यांनी लोकनियुक्त भारत सरकार फैसिस्ट असल्याचे वक्तव्य केले आणि हुज्जत घातली. यामुळे कार्यकर्ते व नागरिकांच्या प्रतिक्रिया उमटल्या. संशयित लोकांबद्दल पोलिसांना तात्काळ कळविण्यात आले. संशयीतांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

भाजप पुणे शहर पदाधिकारी महेश पवळे यांनी दहशतवादी हमासचे उदात्तीकरण करणारी पत्रके वाटल्याबद्दल या संशयितांच्या विरोधात वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे बी एन एस १९६, २९९, ३०२, १८९(२), १९०, १२६(२), १३५ कलमांअतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संशयितांनी देखील महेश पवळे व त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर निराधार गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. BDS Movement संघटनेचा मास्टरमाईंड कोण, त्यांचे ब्रेन वॉशिंग कोणी केले आहे, त्यांना फंडिंग कोण करते, त्यांचे अराजकतावादी लागेबांधे पोलिसांनी शोधून काढून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी विनंती महेश पवळे यांची पोलिसांना केली आहे.

याच संघटनेला खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत निदर्शने करताना थांबवून पोलिसांनी नोटेस बजावली होती. तरीही दुसऱ्या दिवशी हे संशयित लोक कर्वेनगर मध्ये पोलीस परवानगी न घेता निदर्शन करू लागले. त्यामध्ये हमास संबंधी पत्रके वाटू लागले. हे खूप गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाचा राष्ट्र सुरक्षेच्या दृष्टीने सखोल तपास व्हावा अशी मागणी सध्या करण्यात आली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121