दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या कार्याची माहिती दर्शवणारे संग्रहालय तयार करणार! : मंगलप्रभात लोढा

    24-Jun-2023
Total Views | 70
Create A Museum showing information about Late Leader D B Patil

पनवेल
: लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त महात्मा ज्योतिबा फुले सभागृह (आगरी समाज), पनवेल येथे कौशल्य, उद्योजकता, रोजगार आणि नाविन्यता विभागातर्फे 'पंडित दिनदयाळ उपाध्याय' रोजगार मेळाव्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कौशल्य, उद्योजकता, रोजगार आणि नाविन्यता विभागातर्फे गेल्या ऑगस्ट महिन्यापासून ७०० पेक्षा जास्त रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले गेले असून या मध्ये ३० पेक्षा जास्त कंपन्यांनी सहभाग घेतला.
 
दरम्यान, पनवेल येथे झालेल्या सदर मेळाव्यात ९२० युवकांनी उपस्थिती दर्शविली असून यापैकी एकूण ३९१ युवकांना नोकरी मिळाली. तसेच येथे एकूण ४५ कंपनी व आस्थापने सहभागी झाले असून एकूण ४००० पेक्षा जास्त रिक्त पदे उपलब्ध होती. पारंपरिक शिक्षणासह तरुणांनी कौशलय शिक्षणावरती सुद्धा भर द्यावा जेणेकरून नोकरी मिळण्यास मदत होते. आपल्या राज्यात येणारे विविध प्रकल्प, बदलते तंत्रज्ञान, या सगळ्याचाच विचार करून तरुणांना कौशल्य विकास आणि रोजगाराच्या विविध संधी नेहमीच शासन उपलब्ध करून देत राहील, असे मंगलप्रभात लोढांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ सुरु झाल्यावर स्थानिक तरुणांना तिथे रोजगार मिळेल. त्या नोकरीकरीता आवश्यक कौशल्याचा विकास व्हावा यासाठी सुविधा निर्माण करू असे देखील त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे कार्य जगासमोर यावे या उद्देशाने त्यांच्या कामाची माहिती दर्शवणारे संग्रहालय तयार करणार तसेच यासाठी आवश्यक ते सहकार्य आणि आर्थिक तरतूद सरकार तर्फे करण्यात येईल असे आश्वासन मंत्री लोढा यांनी दिले. या मेळाव्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी खासदार रामशेठ ठाकूर, दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्व पक्षीय कृती समिती चे अध्यक्ष शरद दादा पाटील, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
 
अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121