मुंबईकरांचा बसप्रवास आणखी गारेगार; आठ एसी डबल डेकर बससेवेत दाखल होणार

    24-Jun-2023
Total Views | 56
BEST Bus Service Add 8 AC double decker bus

मुंबई
: मुंबईकरांचा बसप्रवास आता आणखी गारेगार होणार असून बेस्ट प्रशासनाकडून आणखी आठ एसी डबल डेकर बस सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आणखी आठ एसी डबलडेकर बस मुंबईच्या रस्त्यांवर चालवण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाकडून घेण्यात आला असून पुढील आठवड्यापासून दक्षिण मुंबईतील विविध मार्गांवर या बस धावणार आहेत. या नव्या आठ एसी डबलडेकर बसमुळे आता एकूण डबलडेकर बसची संख्या बारा होणार आहे.

ऑगस्ट २०२२मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पहिल्या डबलडेकर एसी बसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर आणि १४ जानेवारी रोजी या बस प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार होत्या. परंतु या बसच्या चाचणीचे प्रमाणपत्र प्राप्त होण्यास विलंब झाल्यामुळे आणि आगमन लांबणीवर पडल्यामुळे २१ फेब्रुवारीपासून ही डबलडेकर एसी बस दक्षिण मुंबईच्या रस्त्यांवर धावू लागली. सुरुवातीस बेस्टच्या ताफ्यात दोन इलेक्ट्रिक डबलडेकर एसी बस होत्या. तर त्यानंतर आणखी दोन बस सेवेत आल्यामुळे दक्षिण मुंबईतील एसी डबल देकार बसची संख्या चार वर पोहचली.
 
सध्या बेस्ट प्रशासनाच्या ताफ्यात एकूण ३३ साध्या डबलडेकर बस देखील असून येत्या ऑक्टोबरपर्यंत या बस देखील कालबाह्य होणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121