पंतप्रधान मोदींच्या हस्ते गुरुवारी ‘अमृत भारत’ स्थानकांचे लोकार्पण

- मध्य रेल्वेच्या 12 स्थानकांचा समावेश

    20-May-2025
Total Views |

Prime Minister Modi inaugurated Amrut Bharat stations on Thursday
 
मुंबई: ( Prime Minister Modi inaugurated Amrut Bharat stations on Thursday )  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रेल्वे मंत्रालयाने डिसेंबर 2022 मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘अमृत भारत स्थानक पुनर्विकास योजने’तून रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. आधुनिक, एकात्मिक वाहतूक केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याच्या उद्देशाने भारतातील 1 हजार, 300 हून अधिक स्थानकांचा पुनर्विकास हाती घेतला जात आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. 6 ऑगस्ट 2023 आणि दि. 26 फेब्रुवारी 2024 या दोन टप्प्यांत या स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली. ही योजना दीर्घकालीन विकास, बहुआयामी एकत्रीकरण, दिव्यांगजनांसाठी वाढीव सुविधा, सुधारित शाश्वतता आणि स्थानकांचे भविष्यासाठी तयार असलेल्या शहरी केंद्रांमध्ये रूपांतर यावर लक्ष केंद्रित करते.
 
एका महत्त्वपूर्ण टप्प्यात, भारतीय रेल्वेमधील 103 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. 22 मे रोजी करतील, ज्यामध्ये मध्य रेल्वेअंतर्गत येणार्‍या 80 स्थानकांपैकी 12 प्रमुख स्थानके समाविष्ट आहेत. 138 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या या स्थानकांना आधुनिक सुविधांनी युक्त करण्यात आले आहे. उल्लेखनीय म्हणजे, मध्य रेल्वेअंतर्गत येणार्‍या स्थानकांचे पुनर्विकासाचे काम अवघ्या 15 महिन्यांत यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. यामध्ये केवळ महाराष्ट्रातील 132 स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे, त्यांपैकी या टप्प्यात 18 स्थानकांचे उद्घाटन केले जात आहे.
 
मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांचा समावेश

परळ : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या परळ स्थानकावर प्रवाशांची सोय मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांचा समावेश सुलभता आणि एकूण अनुभव वाढविण्यासाठी अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामुळे परळ स्थानकावरील प्रवाशांना दररोज सरासरी 47 हजार, 738 लोकांची ये-जा असते.
 
चिंचपोकळी : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील चिंचपोकळी स्थानकावर प्रवाशांना सुविधा वाढविण्यासाठी अनेक महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे स्थानकावरील प्रवाशांना मोठा फायदा होईल आणि दररोज सरासरी 36 हजार, 696 लोक ये-जा करतात. या प्रकल्पाचा खर्च 11.81 कोटी इतका आहे.
 
वडाळा रोड : या स्थानकावर स्थानकामध्ये प्रवाशांची सोय, सुरक्षितता आणि स्थानकाचे सौंदर्य वाढवण्यासाठी व्यापक सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामुळे वडाळा रोड स्थानकावरील प्रवाशांना मोठा फायदा होईल. दररोज सरासरी 1 लाख, 32 हजार, 680 लोक येतात.
 
माटुंगा : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात भारतातील पहिले महिला संचालित स्थानक आहे. माटुंगा येथे प्रवाशांच्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी माटुंगा स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली. यासाठी एकूण प्रकल्प खर्च 17.28 कोटी इतकं आहे. माटुंगा स्थानक नवीन प्रवासी-अनुकूल अपग्रेडसह एक आदर्श उदाहरण म्हणून पुढे जात आहे. माटुंगा स्थानकावर दररोज सरासरी 37 हजार, 927 लोकांची ये-जा आहे.