नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात मंगळवारी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ५.४ रिश्टर स्केल एवढी होती. दिल्ली-एनसीआरमध्ये मंगळवारी दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआर, हरियाणा, जम्मू-काश्मीर, पंजाब आणि चंदीगडसह अनेक ठिकाणी हे धक्के जाणवले. त्याचप्रमाणे पाकिस्तानातील इस्लामाबाद, लाहोर आणि आसपासच्या भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. ईएमएससीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्हा होता.
दरम्यान, यामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर काही काळ घबराट उडाली होती. भूकंपामुळे दोडा येथील जिल्हा रुग्णालयाच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत.