अमळनेर दगडफेक प्रकरणी शंभर जणांविरोधात गुन्हा दाखल, तर ३२ जण अटकेत!

    12-Jun-2023
Total Views | 348

Amalner case 
 
 
जळगाव : अमळनेर येथे दोन गटांत राडा झाल्याने २ दिवस संचारबंदी करण्यात आली होती. दोन गट एकमेकांना भिडल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस चकमकीच्या ठिकाणी दाखल झाले. ९ जून रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत आतापर्यंत ३२ जणांना अटक करण्यात आली आहे.
 
अमळनेर शहरातील दगडी गेट परिसरात दोन गटात दगडफेक झाल्याची घटना घडली होती. दोन ते तीन तरुणांमध्ये किरकोळ कारणातून झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर नंतर हाणामारीत झालं आणि या वादाचे पडसाद उमटत दोन गटांमध्ये दगडफेक झाली. दगडफेकप्रकरणी पोलिसांनी ३२ जणांना अटक केली तर शंभर जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच कलम १४४ अन्वये २ दिवस संचारबंदी लागू करण्यात आली होती.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121