बृजभूषण सिंह यांचं कुस्तीपटूंना आवाहन; "...म्हणाले माझ्याविरोधात पुरावे."

    31-May-2023
Total Views | 243
Brijbhushan Singh on Wrestlers Protest
 
नवी दिल्ली : कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी दि. ३० मे रोजी चालू असणाऱ्या कुस्तीपटूच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. बृजभूषण सिंह म्हणाले की, पदके गंगेत फेकल्याबद्दल मला फाशी दिली जाणार नाही. पहिल्या दिवशी माझ्यावर आरोप झाले तेव्हा मी म्हणालो, हे कधी झाले, कुठे झाले, कोणासोबत घडले हे आधी सांगावे. त्यामुळे एकही आरोप सिद्ध झाला तर मी स्वता फाशीवर चढेल.त्यामुळे सरकार मला फाशी देत नाही म्हणून कोणीही गंगेत पदके फेकू नयेत .

बृजभूषण सिंह पुढे म्हणाले की, गंगेत पदके फेकली म्हणून मला फाशी मिळणार नाही. तुमच्याकडे पुरावे असतील तर तुम्ही ते पोलीसांना द्या , कोर्टात द्या आणि कोर्टाने मला फाशी सूनावली तर मी देखील फाशीला सामोरे जाईल. तसेच कुस्तीपटूंच्या गंगेत पदके सोडण्यांच्या घोषणेला भावनिक नाटक म्हणटले आहे. कुस्तीपटूंचे पदक गंगेत वाहण्याच्या घोषणेनंतर बृजभूषण यांनी हे विधान केले आहे.

तसेच बृजभूषण सिंह म्हणाले की, या खेळाडूंच्या यशात माझे रक्त मी आटवले आहे. ऑलिम्पिकमध्ये ७ पदके भारताला मिळाली आहेत. त्यातील ५ पदके ही माझ्या कार्यकाळात मिळालेली आहेत. त्यामुळे आंदोलन करणारे कुस्तीपटू मला दैवत मानत होते. त्यामुळे जाट ते मुस्लिम आणि ब्राह्मण ते तेली माझ्या पाठीशी उभे आहेत. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत लोक माझ्या समर्थनार्थ उभे आहेत. त्यामुळे ५ तारखेला आम्ही संतांसमोर एकत्र येऊ आणि जो निर्णय येईल त्यांचा आदर करू.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121