दिल्ली : रामनवमीनिमित्त दिल्लीत लावलेले भगवे झेंडे आणि पताका पायदळी तुडवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. २८ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये दिसणार्या व्यक्तीचे नाव अजीम असे आहे.हे प्रकरण दिल्लीतील शास्त्री पार्क पोलीस स्टेशन हद्दीशी संबंधित आहे. येथील गली क्रमांक ८ मध्ये राहणाऱ्या सागरने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अजीमविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.अजीमच्या कृत्याचा व्हिडिओही त्याने पोलिसांना दिला होता. या व्हिडीओवरून पोलिसांनी अजीमविरूद्ध एफआयआर नोंदवून त्याला अटक केली आहे.
दिल्ली पोलिसांनी अझीमवर आयपीसी कलम १५३A आणि २९५A अंतर्गत अजीमवर कारवाई केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रात्रीच्या अंधारात कुर्ता-पायजमा घातलेला एक व्यक्ती आधी रस्त्यावर लावलेले भगवे झेंडे काढतो आणि नंतर पायाने ते झेंडे आणि पताका तुडवतो. विशेष म्हणजे या वर्षी रामनवमीच्या दिवशी देशाच्या विविध भागांत कट्टरवाद्यांकडून हिंसाचार करण्यात आला असताना असे कृत्य अजीम नावाच्या व्यक्तिने केले आहे.