स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच भारतीय संस्कृती, हिंदुत्व,भारतीयत्व या सगळ्या राष्ट्रीय अस्मितांना ग्रहण लागण्याची प्रक्रिया थांबायचं नावच घेत नव्हती.
लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर तर हा विषय अधिक गडद होऊ लागला होता. सावरकरांच्या अतिशय कठीण अशा शिक्षा ह्या त्याच्याच द्योतक होत्या. गांधी - नेहरू युगात भारतीय अस्मितांना अधिक अवमानित व्हावे लागले. पण केवळ स्वातंत्र्याची लढाई या एकाच ध्येयासाठी सर्व सामाजिक, राजकीय विचारांच्या धुरीणांनी संयम राखला. नेमक्या ह्या परिस्थितीचा फायदा पं. नेहरू व महात्मा गांधी यांनी बेमालूमपणे घेतला. आपली मनमानी करून रशियन साम्राज्यवादाचं ओझं भारतीयांच्या माथी मारण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आणि भारताचे विविध प्रकारात विभाजन कसे होईल हे प्रयत्नपूर्वक पाहिले.जाती, धर्म, संस्कृती आणि भूप्रदेश या सगळ्यांची तोडफोड करून स्वतःकडे स्वामित्व कसं अबाधित राहील हे कसोशीने पाहिले. भारताची मूळ संस्कृती, विश्वात्मक विचारधारा, आध्यात्म, पांडित्य या दैदिप्यमान परिस्थितीला अधिकाधिक मारक वातावरण तयार करून त्या विचारांच्या सत् शील, पवित्र व्यक्तींना उध्वस्त करायचं आणि या विचारांच्या अस्मितांना ठेचून जनतेला कसं नामोहरम करता येईल याचा पूर्ण विडा उचलला होता.
साहजिकच याच्या प्रतिक्रिया राजकारण आणि समाजकारणाच्या पटलावर उमटू लागल्या. सामाजिक पटलावर रा. स्व. संघ, अभिनव भारत यासारख्या विविध संघटना तयार झाल्या. राजकीय पटलावर आझाद हिंद सेना, फॉरवर्ड ब्लॉक, रिपब्लिकन पार्टी, कम्युनिस्ट पार्टी, समाजवादी पार्टी आणि भारतीय जनसंघ यासारख्या राजकिय संघटना तयार झाल्या.त्यामध्ये जनसंघाने राष्ट्रीय, भारतीय संस्कृतीच्या मुद्द्यांवर जनमत संघटित केले. १९५१ पासूनच काश्मीर अलगाववादावर ठाम भूमिका घेतली आणि आज ७० वर्षांनंतर जेव्हा पूर्ण बहुमत आलं तेव्हा ३७० रद्द करून आज काश्मीर हा वादग्रस्त मुद्दा जगाच्या राजकिय पटलावरून समूळ नष्ट केला.ज्या काँग्रेसमुळे पाकिस्तान अवास्तव मुजोर झाला होता. त्याचा माज उतरून तोच पाकिस्तान आज भिकेला लागलेला आहे.जगात ३६ देशात आज भारताचा रुपया चलन म्हणून स्वीकारला जात आहे. एवढंच काय रुपया आणि अमेरिकन डॉलर बरोबरीच्या किमतीचा होण्याचं आज आपण विश्वासाने स्वप्न पाहू शकतो.
विकासाच्या प्रक्रियेत सर्वसामान्य जनतेचा सहभाग होण्याच्या प्रक्रियेने प्रचंड वेग घेतलेला आहे.बँका ह्या सर्वसामान्य जनतेच्या व्हाव्यात यासाठी बँकांचं राष्ट्रीयीकरण १९७१ साली तत्कालीन पंतप्रधान कै. इंदिरा गांधींनी केले व 'गरिबी हटाव' चा नारा दिला होता. घोषणा करून गरिबी हटत नाही. अंमलबजावणीसाठी कृतीची मानसिकता व तसे प्रामाणिक प्रयत्न हवे असतात.परंतु त्यासाठी २०१५ हे साल उजाडावं लागलं. भाजपचे सरकार आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले. त्यांनी "जनधन योजना" आणली. 'झिरो बॅलन्सवर' सामान्य जनतेचे बॅंकांना खाते उघडण्याची सक्ती केली. बँकांचे मॅनेजर गल्लोगल्ली व वस्त्यावस्त्यांत फिरून जनतेला खाते उघडण्यासाठी आवाहन करू लागले. आज स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा बँकेत खाते उघडणाऱ्यांची संख्या ४८ कोटीपर्यंत पोहोचली..!
आज रस्त्यावरील छोट्यात छोटा व्यावसायिक, भाजीवाला, हातगाडीवरील शेंगदाणे, फुटाणे विक्रेता, पाणीपुरीवाला, फुगे विक्रेता सुध्दा "फोन पे" स्वीकारतो. डिजिटल इंडियाचा हा चमत्कारच म्हणावा लागेल.बुरसटलेल्या सामाजिक रुढीमुळे, स्त्रीभ्रूण हत्यांमुळे इ.विविध कारणांमुळे मुलींचा कमी झालेला जन्मदर आज "बेटी बचाव, बेटी पढाव" यासारख्या योजनांद्वारे वाढलेला आहे.मुलींसाठी, महिलांसाठी, घरकामगारांसाठी खाजगी नोकरीतील, सरकारी नोकरीतील महिलांसाठी अनेक सवलती व उपाययोजना आणून समग्र स्त्री शक्तीचा सन्मान राखण्यासाठी जाणीवपूर्वक भाजपा सरकारने प्रयत्न केले आहेत.
शेतकऱ्यांसाठी पीकविमा योजना, दूरदर्शनवर स्वतंत्र वाहिनी, खत पुरवठ्यासाठी प्रयत्न, मृदा संधारण कार्ड, पाणी योजना, अवर्षणग्रस्त व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य यासाठी सरकारची जागरूकता जाणवते.नवउद्योजकांसाठी, आत्मनिर्भर भारतासाठी स्टार्टअप, स्टँडअप इत्यादी ठोस उपाययोजना तसेच मोठ्या उद्योगांची पायाभरणी यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.आज युध्दसामुग्री बनवणारा देश म्हणून भारताची ख्याती आहे."आयुष्यमान भारत" योजनेद्वारे आरोग्याचा विमा देऊन सामान्य गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.देशात मोठया संख्येने वैद्यकीय महाविद्यालये व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स उभारण्यात येत आहेत.नवीन शिक्षण प्रणाली येत आहे. मूल्याधिष्ठित व व्यावसायिक शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत आहे. शिक्षण व क्रीडा शिष्यवृत्तीमध्ये मुबलक वाढ करण्यात आली आहे.देशाची संस्कृती संवर्धनासाठी विशेष प्रयत्न होत आहेत.करप्रणालीत कमालीची सुधारणा करून देशाला आर्थिक शिस्त व उन्नतीकडे नेण्यासाठी ठोस उपाययोजना कऱण्यात येत आहेत आणि भ्रष्टाचाराच्या पैशाला पायबंद घालण्याच्या योजनांना गती देण्यात येत आहे.
राष्ट्रीय महामार्गांचे जाळे विणले जात आहे. अतिदुर्गम भागात आश्चर्यकारक पूल व बोगद्यांची निर्मिती होत आहे. अतिजलद रेल्वे, सुसज्ज रेल्वेस्थानके, सुखकर प्रवास इत्यादीसाठी विशेष प्रयत्न होत आहेत.विमानतळाचा विकास, सुलभ प्रवास, सुरक्षा व्यवस्था, विमानसेवा वृध्दिंगत होण्यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. मुंबई ते दुबई समुद्रातून रेल्वे प्रकल्पाचा जागतिक उच्चांक होत आहे. भारतातून पाणी निर्यात होईल व तेल आयात होईल.पर्यावरणाचा तोल सांभाळण्यासाठी अनेक उपाययोजना होत आहेत. धार्मिक पर्यटनासाठी विशेष प्रयत्न मा.पंतप्रधान करत आहेत. देशातील महत्वाच्या धार्मिक केंद्रांच्या विकासाची मालिका प्रयत्नपूर्वक सुरू आहे.छत्रपती शिवाजी महाराज तसेच (भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचतीर्थ विकास योजनेद्वारे स्मारकांचा विकास करून अभिवादन केले आहे.) ....महाराणा प्रताप, भगवान बिरसा मुंडा, राजा बसवेश्वर, सरदार वल्लभभाई पटेल इत्यादी राष्ट्रीय पुरुषांची स्मारके नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरावित यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात--
G-२० चे अध्यक्षपद भारताकडे असताना--
विदेशी पाहुण्यांचे पथक भारत भ्रमण करत असताना,
आपल्या देशातील लोकशाहीमध्ये मिळलेल्या घटनादत्त अधिकारांचा गैरवापर करून काही समाजघटक व काही राजकीय पक्ष देशद्रोही कारवायात गुंतलेले आहेत. असे दुर्दैवाने म्हणावे लागते.परंतु सुमारे ६० वर्षं जबाबदार विरोधी पक्ष म्हणून राहिलेला आधीचा जनसंघ व आत्ताचा भा.ज.प.प्रचंड त्याग, तपस्या व बलिदान यामध्ये कसोटीला उतरलेला भा.ज.प. जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने, अभिमानाने, जबाबदार सत्ताधारी पक्ष म्हणून देशाला वैभवाप्रत नेण्यासाठी, भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी कटिबद्ध आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत - आता काँग्रेस नको.. म्हणून भाजपाला १७ कोटी मते मिळाली होती.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत - आता भाजपाच पाहिजे.. म्हणून भाजपला २३ कोटी मते मिळाली होती.
आता २०२४ च्या निवडणुकीमध्ये "महाविजय २०२४ च्या मोहिमेत" ३५ ते ४० कोटी मताधिक्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत व प्रयत्न सुरू केले आहेत आणि त्याचसाठी दिनांक ६ एप्रिल २०२३ या पक्षाच्या वर्धापन दिनाला भाजपा संकल्पित होत आहे.
-लक्ष्मण सावजी
प्रवक्ता, भा.ज.पा.