'तो' परत येतोय!

पालिकेने सेव्हन हिल्स आणि कस्तुरबा रुग्नालयातील खाटांची संख्या वाढवली

    01-Apr-2023
Total Views | 97
 
Covid-19
 
 
मुंबई : राज्यासह संपूर्ण देशभरात मध्यंतरी करोनाची साथ ओसरल्याचे पाहण्यास मिळाले. परंतु आता करोनाच्या XBB १.१६ या नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा देशाची चिंता वाढू लागली आहे. कोरोना काळात हॉटस्पॉट ठरलेल्या प्रमुख राज्यांपैकी एक राज्य महाराष्ट्र होते. पण योग्य नियोजनामुळे कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले होते. मात्र राज्यासह मुंबई शहरातही कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 
 
 
मुंबई अलर्ट मोडवर
 
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या वेळी देशातील कोरोनाची मुख्य हॉटस्पॉट ठरलेली मुंबई पुन्हा एकदा अलर्ट मोडवर गेली आहे. मुंबई महानगरपालिकेने सेव्हन हिल्स आणि कस्तुरबा या दोन रुग्णालयांमधील खाटांची संख्या वाढवली असून यासंदर्भात शुक्रवारी मुंबई महापालिकेची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस सर्व रुग्णालयांचे मुख्य उपस्थित होते. या बैठकीत रुग्णालयांतील उपलब्ध खाता,औषधे आणि प्राणवायूचा साठा यांचाही आढावा घेण्यात आला. या कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी रक्तशुद्धीकरण केंद्र, शस्त्रक्रियागृह, लहान मुलांसाठी अतिदक्षता विभाग, कोरोना चाचणी कक्ष, रेमेडेसिवीर इंजेक्शन, आणि प्राणवायूचा साथ सज्ज ठेवण्याचाही सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, व इतर कर्मचाऱ्यांना सक्तीने मास्क वापरण्याच्याही सूचना प्रशासनाने बैठकीत दिल्या आहेत.
 
 
दुबई आणि चीनच्या प्रवाशांची कोरोना चाचणी होणार
 
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दुबई आणि चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करा अशी सूचना महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सने केली आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य विभागातील सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत टास्क फोर्सकडून ही सूचना करण्यात आली आहे.
 
चार आठवड्यांपूर्वी कोरोना रुग्णांची चाचणी सकारात्मक येण्यारा १.०५ टक्के हा आता ५ टक्क्यांवर पोहचला आहे. एवढंच नाही तयार २२ ते २८ मार्च दरम्यान हा दर ६.१५ टक्क्यांवर पोहचला होता.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121