मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मुसंडी’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

    23-Feb-2023
Total Views | 64
MUSANDI 
 
मुंबई : यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षांमध्ये यश मिळवणं सोपं नाही, पण वाटतं तितकं कठीणही नाही. निश्चित ध्येय, एकाग्रपणे आणि चिकाटीने अभ्यास करण्याची वृत्ती यामुळे या परीक्षांत यश नक्कीच मिळू शकतं हे सांगणाऱ्या ‘मुसंडी’ या चित्रपटाचे पोस्टर अनावरण नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत, गोवर्धन दोलताडे लिखित, निर्मित आणि शिवाजी दोलताडे दिग्दर्शित 'मुसंडी' हा मराठी चित्रपट २६ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 
यावेळी मंत्री संदीपान भुमरे, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री संजय राठोड, मंत्री गुलाबराव पाटील, रामदास कदम, अर्जुन खोतकर, खासदार हेमंत गोडसे, मा. शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुहास कांदे, आमदार संजय शिरसाट, आमदार शहाजीबाप्पू पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार शांताराम मोरे, आमदार बालाजी कल्याणकर व चित्रपट निर्माते गोवर्धन दोलताडे यांच्यासह मंत्रीमंडळातील अनेक सहकारी उपस्थित होते.
 
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना नियोजन करणं महत्त्वाचं आहे. हे नियोजन कशाप्रकारे करावं हे सांगताना या परीक्षेतल्या अपयशाकडेही सकारात्मक दृष्टीने पहात जिद्दीने यश मिळवता येऊ शकते हे सांगणारा हा चित्रपट असल्याचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांगितले. वेगळ्या विषयासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुसंडी’ चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.
 
रोहन पाटील आणि गायत्री जाधव ही जोडी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असून या दोघांसोबत सुरेश विश्वकर्मा, शुभांगी लाटकर, तान्हाजी गळगुंडे, शिवाजी दोलताडे, सुरज चव्हाण, अरबाज शेख, प्रणव रावराणे, अक्षय टाक, घनश्याम दरवडे (छोटा पुढारी),सनमीता धापटे, वैष्णवी शिंदे, माणिक काळे, सुजीत मगर, मयुर झिंजे, ऋतुजा वावरे, विकास वरे, राधाकृष्ण कराळे यांच्या भूमिका आहेत. राज्यासह देशातील IAS, IPS आणि यशस्वी उदयोजक यांचे मार्गदर्शन घेऊन या चित्रपटाची कथा रचना करण्यात आली आहे. 'मुसंडी' चित्रपट २६ मे ला प्रदर्शित होणार आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121