मैथिली जावकर अशीच आहे चित्ता जोशीमध्ये पंचरंगी भूमिकेत!

    15-Feb-2023
Total Views | 136
 
मुंबई : प्रख्यात दिग्दर्शिका सुधाताई करमरकर, प्रयोगशील दिग्दर्शक चेतन दातार आणि प्रतिभावंत दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांच्या तालमीत अभिनयाचे धडे गिरवून, नंतर व्यावसायिकला प्रकाश बुद्धिसागर, दिलीप कोल्हटकर, गणेश यादव, संतोष पवार, आणि चंद्रकांत कुलकर्णी अश्या मातब्बर दिग्दर्शकांसोबत थिएटर करत रंगभूमीवर पाय रोवून भक्कमपणे आपलं अस्तित्व निर्माण करण्यात यशस्वी असलेली लोकप्रिय अभिनेत्री मैथ्थिली जावकर आज अभिनय, नृत्य, लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती अशी पंचरंगी लीलया पेलत लवकरच रसिकांना नव्या साजात दिसणार आहे. तिच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या 'अशीच आहे चित्ता जोशी' या महत्वाकांक्षी नाटकाद्वारे ती येत्या १९ फेब्रुवारी पासूनपुन्हा रंगमंचावर अवतरणार आहे.

maithili jawkar 
 
'संस्कार भारती'(कोकण प्रांत) यांच्या सहयोगाने, 'ओम साईनाथ प्रॉडक्शन्स' निर्मित, 'श्री चित्र- चित्रलेखा' प्रकाशित २ अंकी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या "अशीच आहे चित्ता जोशी" या अत्यंत वेगळ्या संवेदनशील नाटकाची लेखिका, निर्माती, दिग्दर्शिका, आणि चित्ता जोशी या शीर्षक भूमिकेत मैथ्थिली जावकर रंगमंचावर लवकरच दिसणार आहे. तसेच घराघरात लोकप्रिय झालेल्या रामायण मालिकेतील 'भरत' अर्थात अभिनेते संजय जोग यांचा सुपुत्र आणि आजच्या टेलिव्हिजन युगातला चमचमता तारा, अभिनेता रणजीत संजय जोग ह्या नाटकात प्रमुख नायकाच्या भूमिकेत आहे. सध्या मुंबईतील पार्ले परिसरात या नाटकाच्या सपाटून तालमी सुरु असून येत्या १९ फेब्रुवारीला या नाटकाचा रंगमंचावर शुभारंभ होणार आहे.
 
मैथिली जावकर या गुणी अभिनेत्रीने चित्रपट, नाटक, मालिका अश्या सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. अभिनय, नृत्य निर्मिती अश्या सर्व आघाड्यांवर त्यांनी अनेक वर्ष काम करून आपला एक प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. भरत नाट्यम या नृत्यकलेत पारंगत असलेल्या मैथ्थिली जावकर हिने आजमितीस शेकडो व्हिडीओ अल्बम्स, लावणी, लोकनृत्याचे शो प्रत्यक्ष सादर केले आहेतच पण त्यासोबत स्टार प्रवाहवरील लोकप्रिय 'अग्निहोत्र', 'वादळवाट', 'चार दिवस सासूचे', 'दामिनी', 'घरकुल' 'इन्स्पेक्टर' अश्या ३७ मराठी मालिका तसेच 'चारचौघी', 'शोभायात्रा', 'वा सुनबाई वाह!', 'आई परत येतेय', 'बायको असून ब्रम्हचारी!', 'सहकुटुंब.कॉम', 'दांडेकरांचा सल्ला' अश्या अनेक लोकप्रिय १८नाटकांमधून भूमिका केल्या आहेत. 'आधारस्तंभ', 'छबू पळाली सासरला', 'आई मला माफ कर', 'आता मी कशी दिसते?', 'बायको आली बदलून', 'आयला लोच्या झाला रे', 'खंडोबाच्या नावाने चांगभलं', 'माहेर चा निरोप', 'शांती ने केली क्रांती', 'मेनका उर्वशी' इत्यादी २२ मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. तिने 'कलर्स मराठी'च्या मराठी 'बिग बॉस' सिझन २' शोमध्येही सहभाग घेतला होता.
 
अत्यंत वेगळ्या धाटणीच्या 'अशीच आहे चित्ता जोशी' ह्या नाटकाच्या निमित्ताने निमित्ताने मैथ्थिली व्यावसायिक नाटकाची लेखिका आणि दिग्दर्शिका बनते आहे. या नाटकात रणजीत संजय जोग, रुचीर गुरव ( स्वाभिमान फेम मयंक ), यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. एका ज्वलंत विषयावरील धगधगतं नाटक खास रसिकांसाठी येत असून नेमकी कशी आहे चित्ता जोशी? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनी शुभारंभाचा प्रयोग चुकवू नये.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121