पुणे : देशात जिथे सरकारी यंत्रणा पोहचत नाही तिथे या सामाजिक संस्था लोकांना सेवा देत असतात. सह्याद्री पर्वत रांगेतील कोकण, ठाणे, पुण्यातील अतिवृष्टी होणार्या भागातील शेतकर्यांची परीस्थिती लक्षात घेऊन ‘गेब्ब्स हेल्थकेअर सोल्युशन्स’ या कंपनीने ‘वाय ४ डी फौंडेशन’ या सामाजिक संस्थेला सोबत घेत ‘पर्यावरण जतन आणि संवर्धन प्रकल्प’ हाती घेतला असून त्यासाठी पुण्यातील वेल्हे तालुक्यातील बालवड गावाला ‘मॉडेल गाव’ म्हणून विकसित करणार आहेत.
सह्याद्री पर्वत रांगेतील गावामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर पडून देखील त्याचा उपयोग शेतकर्यांना होत नाही. पावसाचे पाणी उताराने वाहून जाते. बाकीचे महिने त्यांच्या हाताला कामं शिल्लक राहत नाही म्हणून गेब्ब्स ने हा मुद्द हेरून शेतकर्यांच्या हाताला वर्षभर कामाची सोय करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी ‘पर्यावरण जतन आणि संवर्धन’ कार्यक्रम हाती घेण्यात आला असून गेल्या महिन्यात झालेल्या शेतकरी दिनानिमित्त ‘वाय फोर डी ने’ गावात कृषी मार्गदर्शन सत्र आयोजित केले होते. यात कृषी अधिकारी उमेश शिंदे यांनी शेती विषयक योजनाची माहिती देऊन योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करायला हवे शेतकर्यांना समजावून सांगितले. उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याच्या उद्देश्याने बालवड गावात उताराच्या शेतीचे टप्पे करून बांधबंदिस्ती करून पावसाचे पाणी अडवण्यात येणार आहे. गावातील काही ठिकाणी शेततळे तयार करून वर्षभरासाठी त्यावर शेती कशी करावी याचे शेतकर्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
पर्यावरणाचे संरक्षण करत शेतांना बांध घालण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. शेतकरी शेतात फळ लागवड करण्यास इच्छुक असतात म्हणून सुरुवातीला पुणे जिल्ह्यात १००० तर ठाणे जिल्ह्यात १५०० फळ झाडे लावण्याचे नियोजन करण्यात्त आले असून अनेक शेतकर्यांना याचा फायदा मिळणार आहे. फळ झाडांची लागवड मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली जाते. मात्र किरकोळ पैशाच्या मोहापायी त्याची तोड होते. असे वृक्ष जाळून कोळसा तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. याचे महत्व संबधिताला जमीन मालकाला पटवून देण्याचे अनोखे कार्य गेब्ब्स हेल्थकेअर सोल्युशन मार्फत सह्याद्री पर्वत रांगेतील कोकण ठाणे पुणे भागात केले जात आहे. त्यातून जैव विविधता संरक्षणाचे काम ‘गेब्ब्स’ ने ‘वाय फोर डी’ च्या हाती दिले आहे.