सुप्रिया श्रीनेत यांनी ट्विट केलेल्या व्हीडिओ प्रकरणी नाव न घेत सभागृहात उपराष्ट्रपतींनी सुनावले!
07-Dec-2023
Total Views | 69
नवी दिल्ली : राज्यसभेचे कामकाज गुरुवारी सुरू होताच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नतमस्तक झाल्याबद्दल विरोधी पक्षातील नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. सुप्रिया श्रीनेत यांचे नाव न घेता उपराष्ट्रपतींनी विरोधकांना सुनावले. काँग्रेसच्या काही नेत्यांनी उपराष्ट्रपतींचा व्हिडिओ 'भारताचे उपाध्यक्ष' या कॅप्शनसह शेअर केला होता. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये उपराष्ट्रपती धनखड कारमधून खाली उतरून भारतीय परंपरेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना नमस्कार करत आहेत.
यावर धनखड म्हणाले, "आदरणीय सदस्यांनो, आजकाल मी किती नतमस्तक व्हावे, मी कोणाच्या समोर नतमस्तक होऊ? फोटोग्राफर कुठून काय घेतोय...कोण इन्स्टाग्रामवर पोस्ट करेल...ट्विटरवर कोण पोस्ट करेल? मी तुम्हाला सांगू इच्छितो की वाकून नमस्कार करणे ही माझी सवय आहे. मी हे नाही पाहत की समोर कोण आहे." असं प्रत्त्युत्तर उपराष्ट्रपतींनी दिलं.