गुरपतवंत सिंह पन्नू प्रकरणावर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री म्हणतात...

    02-Dec-2023
Total Views | 60
 
Antony Blinken
 
 
नवी दिल्ली : अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन यांनी गुरुवारी (३० नोव्हेंबर २०२३) खलिस्तानी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ब्लिंकन यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले की, 'हा एक कायदेशीर मुद्दा आहे आणि हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतलं जात आहे. आम्ही तपासाच्या निकालाची वाट पाहत आहोत.' असं त्यांनी म्हटलं आहे.
 
 
 
ब्लिंकन म्हणाले की, “या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मी याबद्दल सविस्तर बोलू शकत नाही. पण मी निश्चितपणे सांगू शकतो की, आम्ही हे प्रकरण खूप गांभीर्याने घेत आहोत. नुकताच आम्ही हा मुद्दा थेट भारत सरकारकडे मांडलाय. भारत सरकारने या प्रकरणाची चौकशी करत असल्याचं जाहीर केलंय. हे योग्य पाऊल असून, आम्ही तपासाच्या निकालाची वाट पाहत आहोत." अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री यांच्याआधी व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनीही हे आरोप आणि तपास गांभीर्याने घेत असल्याचे म्हटले होते.
 
 
कोण आहेत गुरपतवंत सिंह पन्नू ?
 

Antony Blinken 
 
गुरपवंत सिंह पन्नू हे खलिस्तानी समर्थक अमेरिकन वकील आहेत. त्यांचं वय 40 ते 50 च्या दरम्यान आहे. त्याचा संबंध अमृतसरच्या खानकोट गावाशी आहे. त्याचे वडील महिंदर सिंह पंजाब राज्य शेतकी विपणन बोर्डात कर्मचारी होते. पन्नू यांनी 1990च्या दशकात पंजाबमधून कायद्याची पदवी घेतली आणि सध्या ते अमेरिकेत वकील आहेत.
 
न्यूयॉर्कस्थित खलिस्तान समर्थक संघटना सिख्स फॉर जस्टिसचे ते संस्थापक आहेत आणि त्यांना खलिस्तानी नेते म्हणून ओळखलं जातं. पन्नू यांनी नुकताच सर्व शीखांना एअर इंडियाच्या विमानांनी प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता. असं करणं धोकादायक होऊ शकतं, असा त्यांचा दावा होता.या प्रकरणी NIA ने भारतात पन्नूवर FIR दाखल केला आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
रिपब्लिकन पक्षाच्या भारत जिंदाबाद यात्रेला देशभरात उर्त्स्फुत प्रतिसाद --- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

रिपब्लिकन पक्षाच्या भारत जिंदाबाद यात्रेला देशभरात उर्त्स्फुत प्रतिसाद --- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

पहलगाम मध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने सिंदुर ऑपरेशन करुन पाकिस्तानी अतिरेक्यांचा खात्मा केला .सिंदुर ऑपरेशन यशस्वी झाल्याबद्दबल भारतीय सैन्याचे आणि प्रधानमंत्री नरेद्र मोदींचे अभिनंदन करण्यासाठी तसेच सिंदुर ऑपरेशनचा विजय साजरा करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देशभरात भारत जिंदाबाद यात्रा काढण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.त्यांच्या आवाहनाला देशभरात रिपब्लिकन कार्यकर्त्यांने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121